प्रतिनिधी
मुंबई : अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद देऊन भाजपच्या सत्तेच्या वळचाळीला आणून बसवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदींना शरद पवारांनी कालच्या “इंडिया” आघाडीच्या पत्रकार परिषदेत आव्हान दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. शिखर बँक घोटाळा आणि सिंचन घोटाळे यांचा त्यांनी उल्लेख केला होता. आता त्यांनी चौकशी करावी आणि दोषींना तुरुंगात धाडावे, असे आव्हान पवारांनी कालच्या पत्रकार परिषदेत दिले. Don’t cry if Modi investigates scams
शरद पवारांच्या या आव्हानाला भाजपकडून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिले. पंतप्रधान मोदींनी घोटाळ्यांची चौकशी सुरू केली, तर त्यांना सामोरे जा. रडत बसू नका, असा टोला मुनगंटीवार यांनी शरद पवारांना हाणला. मोदींनी कुठल्याही घोटाळ्याची चौकशी केली की शरद पवार त्यात राजकारण आहे, असे सांगत असतात. पण ते स्वतःच पंतप्रधानांना घोटाळ्यांच्या चौकशीचे आव्हान देतात. आता मोदींनी चौकशी लावली तर त्यांनी रडू नये. चौकशीला सामोरे जावे, असे मुनगंटीवार म्हणाले.
2019 पूर्वी शिखर बँक घोटाळ्यात पवारांना ईडीने नोटीस पाठवली नव्हती, तरी देखील ईडीची नोटीस आपल्याला आली अशी हूल देऊन पवारांनी आपण ईडीच्या ऑफिसमध्ये चौकशीला स्वतःहून जाऊ असे आव्हान देत राजकीय स्टंट केला होता. त्या स्टंटचा अप्रत्यक्ष उल्लेख मुनगंटीवार यांनी करून मोदींनी खरी चौकशी लावली तर रडू नका, असे प्रतिआव्हान दिले आहे.
Don’t cry if Modi investigates scams
महत्वाच्या बातम्या
- विरोधी आघाडी I.N.D.I.A.ची आज मुंबईत तिसरी बैठक, जवळपास २८ पक्षांची जमवाजमव केल्याचा दावा
- मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे गंभीर आरोप, न्यायव्यवस्थेत प्रचंड भ्रष्टाचार; वकील जे लिहून नेतात, तोच निकाल येतो!!
- पुरुषोत्तम करंडक प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर अंतिम स्पर्धेसाठी नऊ संघांची घोषणा
- ‘मोदींशी लढण्याआधी आपापसातील भांडणं मिटवा…’ मुख्तार अब्बास नक्वींचा I.N.D.I.A आघाडीवर टोला