विशेष प्रतिनिधी
जालना – केंद्र सरकारच्या गाईडलाईननुसार देशातील इतर राज्यातून महाराष्ट्रात विमानाने येणाऱ्या प्रवाशांनी लसीचे दोन डोस घेतलेले असताना त्यांना RTPCR चाचणी बंधनकारक असणार नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.Domestic air passengers RTPCR is not binding
परदेशांतून आलेल्यांना RTPCR चाचणी बंधनकारक असून ७ दिवस क्वारंटाईन राहावे लागेल, असे राजेश टोपे यांनी म्हंटले आहे.राज्यात पहिल्या डोसच लसीकरण ८२ टक्के झालं असून दुसऱ्या डोसच ४४ टक्के लसीकरण झालं आहे.
साडेसात कोटी लोकांना पहिला डोस दिला आहे. साडेचार कोटी लोकांना दुसरा डोस दिला आहे.राज्यात लसीकरण वेगाने सुरु असून टार्गेट पूर्ण होत नाही तोपर्यंत लसीकरण सुरूच राहील. राज्यात लॉकडाऊन लावण्याचे कोणतंही कारण नाही, असे ते म्हणाले.
- राज्यांतर्गत विमान प्रवाशांना RTPCR चे बंधन नाही
- परदेशी नागरिकांना RTPCR चाचणीचे बंधन
- परदेशी नागरिकांना ७ दिवस क्वारंटाईन राहावे
- राज्यात लॉकडाऊन लावण्याचा विषयच नाही
- राज्यात लसीकरण वेगाने सुरूच राहील