नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सगळं ठरवत असता, तर (भाजपचे अध्यक्ष निवडायला) एवढा वेळ लागला असता का??, असा परखड सवाल करून सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी संवादामध्ये उपस्थित असलेल्या सगळ्यांची आणि प्रश्नकर्त्यांची फिरकी घेतली. संघ संवादात तिसऱ्या दिवशी मोहन भागवत यांनी अनेक सवालांची स्पष्ट उत्तरे दिली. त्यापैकीच एक सवाल संघ आणि भाजप यांच्या संबंधांमधला होता. भाजपच्या सगळ्या गोष्टी संघच ठरवत असतो, असे एक विधान त्या सवालात होते.Does RSS decide everything? This is completely wrong
त्यावर बोलताना मोहन भागवत म्हणाले, पूर्णपणे चुकीचे हे वक्तव्य आहे. संघ काही ठरवत नाही. प्रत्येक क्षेत्रात आपापले काम करणारे लोक आहेत ते त्यांचा निर्णय त्यांच्या पद्धतीने घेत असतात. मी 50 वर्षे शाखा चालवतोय. त्यामुळे शाखा चालवण्यात मी एक्सपर्ट आहे पण सरकार चालवण्यात ते एक्सपर्ट आहेत. आम्ही दोघेही एकमेकांची एक्सपर्टाइज मानतो. त्यामुळे संघ भाजपचे निर्णय घेतो, हे वक्तव्य चुकीचे आहे. सल्ला सगळेजण देऊ शकतात तसा मागितला तर संघही सल्ला देतो. पण निर्णय त्यांचा असतो. त्या निर्णयाबद्दल संघाचे काही म्हणणे नसते. संघ सगळे ठरवत असता, तर (भाजपचा अध्यक्ष निवडायला) एवढा वेळ लागला असता का??, अशी टिप्पणी करून मोहन भागवत यांनी उपस्थितांची आणि प्रश्नकर्त्यांची फिरकी घेतली.
भाजप अध्यक्ष निवडीत घोळ
भाजपच्या अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया गेले सहा महिने सुरू आहे. पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा कार्यकाल संपून सहा महिने उलटून गेले आहेत. परंतु भाजपने अद्याप नवा अध्यक्ष नेमलेला भाजपच्या अध्यक्षपदाच्या नावांमध्ये संघ आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या समोर आल्यात. त्याचबरोबर शिवराज सिंह चौहान, मनोहर लाल खट्टर, भूपेंद्र यादव, निर्मला सीतारामन, डी. पुरंदरेश्वरी आदी नावे देखील माध्यमांमधून समोर आली. पण संघ आणि भाजप यांच्या निर्णय घेणाऱ्या नेत्यांपैकी एकाने गेल्या सहा महिन्यांमध्ये याविषयी कुठलेही भाष्य केलेले नाही. त्याचबरोबर निर्णय देखील घेतलेला नाही.
एका वाक्यात बराच “प्रकाश”
या राजकीय पार्श्वभूमीवर डॉ. मोहन भागवत यांना भाजपच्या सगळ्या गोष्टी संघच ठरवत असतो. संघ आणि भाजप यांचे संबंध नेमकी आता कसे आहेत??, कुठल्या मुद्द्यांवर मतभेद आहेत??, कुठल्या मुद्द्यांवर मतऐक्य आहे??, असा सवाल अनेकांनी केला होता. त्या सवालाला मोहन भागवत यांनी परखड उत्तर दिले. संघ सगळे ठरवतो हे विधानच मूळात चुकीचे आहे. कारण तसे घडू शकत नाही. ज्या विषयात जो एक्स्पर्ट असतो, त्या विषयात तो निर्णय घेत असतो. त्यामध्ये मतभेद असू शकतात, पण मनभेद नसतात. प्रत्येक क्षेत्रातल्या तज्ज्ञ व्यक्ती त्यांचे निर्णय घेतात. त्याला वेळ लागला तरी त्याविषयी संघ काही बोलत नाही. संघाचे त्याविषयी काही मत नाही. ज्याला जेवढा वेळ घ्यायचा आहे की नाही तेवढा घ्यावा. पण निर्णय त्यांनाच करायचा आहे. संघ जर सगळं ठरवत असता, तर (भाजपचे अध्यक्ष निवडायला) एवढा वेळ लागला असता का??, अशी टिप्पणी करून भागवत यांनी फक्त एका वाक्यात भाजप मधल्या बऱ्याच अंतर्गत गोष्टींवर “प्रकाश” टाकला.
भागवतांच्या वक्तव्याचे अर्थ
मोहन भागवतांच्या या वक्तव्यातून अनेक अर्थ बाहेर निघाले. अध्यक्ष निवडायला भाजपचे वरिष्ठ नेते फार वेळ लावत आहेत. त्यांनी लवकरात लवकर अध्यक्ष निवडावा, अशी सूचना भागवतांनी जाहीरपणे दिल्याचा अर्थ अनेकांनी काढला. त्याचबरोबर भागवतांनी जाहीर कानपिचक्या दिल्यानंतर भाजपचे नेते आता लवकर निर्णय घेतील किंबहुना त्यांना लवकर निर्णय घ्यावा लागेल, असाही अर्थ अनेकांनी काढला.
आजच्या प्रश्नोत्तरांच्या सत्रामध्ये केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर, गजेंद्र सिंह शेखावत हे उपस्थित होते. त्याचबरोबर माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे हे देखील हजर होते.
Does RSS decide everything? This is completely wrong
महत्वाच्या बातम्या
- Mohan Bhagwat संघाला विरोध कमी होण्यामागे प्रेमाची शक्ती, मोहन भागवत यांचे प्रतिपादन
- BJP States : भाजपशासित राज्यांनी म्हटले- न्यायालय विधेयकांना मान्यता देऊ शकत नाही, हा फक्त राज्यपाल किंवा राष्ट्रपतींचा अधिकार
- गणपतीच्या पहिल्या दिवशी झाली बंधूंची भेटीगाठी; पण फोटोला पोज देताना घातली हाताची घडी!!
- Ganesh festival in other parts of the world : पहा जगातील कोणत्या कोणत्या देशात गणेशोत्सव साजरा होतो ?