विशेष प्रतिनिधी
मुंबई – तोंडाचा कर्करोग हा कर्करोगांमध्ये सर्वात वेदनादायी असतो. त्यामुळे लवकरात लवकर त्याचे निदान करून अशा रुग्णांवर तत्काळ उपचार करता यावेत, यासाठी तोंडाचा कर्करोग होण्याची शक्यता असलेल्या नागरिकांचा शोध घेतला जाणार आहे.Doctors will check 1 lack peoples for Oral cancer
साठी इंडियन डेंटल असोसिएशनने राज्य सरकारच्या दंत महाविद्यालयासह करार केला आहे. या मोहिमेअंतर्गत एक मार्चपर्यंत एक लाख नागरिकांची चाचणी केली जाणार आहे. तोंडाचा कर्करोग असलेले सर्वाधिक रुग्ण हे दंत शासकीय रुग्णालयात येतात. यासाठी राज्यातील प्रत्येक दंत महाविद्यालयासोबत इंडियन डेंटल असोसिएशनने करार केला आहे.
तोंडाच्या विविध समस्येने ग्रस्त सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील शासकीय रुग्णालयात येतात. त्यामुळे येथे येणाऱ्या जास्तीत जास्त रुग्णांची चाचणी केली जाणार आहे. यासंदर्भात १५ ते २० दिवसांपूर्वी करार झाला असून डॉक्टरांना रुग्णांच्या तोंडाची तपासणी कशी करायची, याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
रुग्णालयात येणाऱ्या ज्या रुग्णांना सिगारेट, तंबाखू, पान-मसाला, गुटखा याची सवय आहे. अशांची थुंकी नमुना म्हणून घेतली जाणार आहे. त्यामध्ये कर्करोग आढळल्यास त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत.
Doctors will check 1 lack peoples for Oral cancer
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदींच्या कानपूरमधील सभेत दंगलीचा कट, सीसीटीव्हीमुळे उघड, समाजवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्याला अटक
- पुणे रेल्वे स्थानकावर मास्क न वापरल्याने तब्बल २,७०० जणांवर कारवाई
- ब्रेकिंग : मुंबईतील स्टेट बँक ऑफ इंडियावर गोळीबार
- प्रियांका गांधी म्हणाल्या, देश के लिए मिलकर लढेंगे जितेंगे!!; पण सुनील शास्त्री यांचा प्रतिसाद का नाही??