• Download App
    अमरावतीत येऊन काय पुन्हा इथलं वातावरण भडकवायचं आहे का? यशोमती ठाकूर यांचा किरीट सोमय्यांना सवाल!Do you want to come to Amravati and provoke the atmosphere here again? Question from Yashomati Thakur

    अमरावतीत येऊन काय पुन्हा इथलं वातावरण भडकवायचं आहे का? यशोमती ठाकूर यांचा किरीट सोमय्यांना सवाल!

    अमरावतीमध्ये हिंसा घडली असल्यामुळे कलम १४४ नुसार संचारबंदी लागू केली आहे.अमरावती गेल्या काही दिवसांपासून हिंसाचारमुळे तणावपूर्ण वातावरणात आहे.Do you want to come to Amravati and provoke the atmosphere here again? Question from Yashomati Thakur


    विशेष प्रतिनिधी

    अमरावती:त्रिपुरातील कथित घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी मुस्लिम समाजाने काढलेल्या मोर्चात मोठा हिंसाचार पाहायला मिळाला. त्यानंतर भाजपकडून अमरावती बंदची हाक देण्यात आली.दरम्यान अमरावतीमध्ये हिंसा घडली असल्यामुळे कलम १४४ नुसार संचारबंदी लागू केली आहे.अमरावती गेल्या काही दिवसांपासून हिंसाचारमुळे तणावपूर्ण वातावरणात आहे.



    दरम्यान भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या अमरावती दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, पोलिसांकडून सोमय्या यांना अमरावती दौरा रद्द करण्याची विनंती करण्यात आली आहे. परिस्थिति नियंत्रणात असली तरी अजूनही संचारबंदी कायम आहे. त्याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी देखील किरीट सोमय्या यांच्या दौऱ्यावर आक्षेप घेतला आहे.

    पालकमंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या की, किरीट सोमय्या यांनी अजून १५ दिवस तरी अमरावतीत येऊ नये, असा सल्ला त्यांनी दिला. तसेच अमरावतीत येऊन त्यांना काय पुन्हा इथलं वातावरण भडकवायचं आहे का, असा सवाल त्यांनी विचारला. त्यामुळे आता किरीट सोमय्या आपला दौरा रद्द करतील का याकडे सर्वांचे लक्ष होते.

    Do you want to come to Amravati and provoke the atmosphere here again? Question from Yashomati Thakur

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Operation sindoor : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या काँग्रेसच्या मागणीला शरद पवारांचा खोडा!!

    Operation sindoor : भारताने पाकिस्तानच्या किराणा हिल्स वरील अण्वस्त्रांना धक्का लावला का??, भारतीय हवाई दलाच्या DGMO चे “कानावर हात”!!