• Download App
    तुम्ही हरलेल्या 2 जागा देऊन आमची बोळवण करता का??; ठाकरे + पवार + थोरातांवर आंबेडकरांच्या वंचितचा लेटर बॉम्ब!!|Do you invite us by giving away 2 lost seats??; Letter bomb of Ambedkar's deprivation on Thackeray + Pawar + Thorat!!

    तुम्ही हरलेल्या 2 जागा देऊन आमची बोळवण करता का??; ठाकरे + पवार + थोरातांवर आंबेडकरांच्या वंचितचा लेटर बॉम्ब!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागावाटपाली सगळी “सिक्रेट्स” माध्यमांसमोर उघडी करत चाललेल्या प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने आता ठाकरे + पवार + थोरातांवर लेटर बॉम्ब टाकला आहे. महाविकास आघाडीने हरलेल्या 2 जागा देऊन आमची बोळवण करता का??, असा परखड सवाल वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या रेखा ठाकूर यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांना केला आहे.Do you invite us by giving away 2 lost seats??; Letter bomb of Ambedkar’s deprivation on Thackeray + Pawar + Thorat!!

    महाराष्ट्रातल्या 48 जागांचा तिढा महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांच्या नेत्यांना सुटता सुटत नाहीये. प्रकाश आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी कधी महाविकास आघाडीच्या चर्चेत सामील होऊन किंवा न होऊन आघाडीची सगळी “सिक्रेट्स” माध्यमांसमोर ओपन करत चालले आहेत. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या बार्गेनिंग मुळे जागावाटपाला उशीर होत असल्याची महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांच्या नेत्यांची भावना आहे, पण त्यांच्या या भावनेला वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या रेखा ठाकूर यांनी पत्र लिहून सुरूंग लावला आहे. महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला केवळ 2 जागा देऊ केल्याची बातमी येताच रेखा ठाकूर यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्या नावाने पत्र लिहून ते वंचित बहुजन आघाडीच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर देखील केले आहे. त्यामुळे पत्रामध्ये वंचित बहुजन आघाडीने ठाकरे + पवारा + थोरातांवर नेमके काय आरोप केलेत??, हे सगळ्या जनतेसमोर उघड झाले आहे.



    रेखा ठाकूर यांनी या पत्राद्वारे संताप व्यक्त केला असून येत्या ९ मार्चच्या बैठकीत यावर साकारात्मक चर्चा कराल, अशी अपेक्षा त्यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्याकडे व्यक्त केली आहे. तसेच आपली युती भक्कम व टिकाऊ करण्याचा आमचा प्रयत्न आहे, याची आम्ही तुम्हा तिघांना खात्री देत आहोत, असंही त्यांनी म्हटलं आहे.

    रेखा ठाकूर यांचे पत्र जसेच्या तसे

    उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरदचंद्र पवार आणि बाळासाहेब थोरात

    सस्नेह जयभीम,

    ६ मार्च, २००२४ रोजी फोर सिझन्स, वरळी येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकी संदर्भात हे अतिशय महत्वाचे पत्र भी आपणा विद्यांना वचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीच्या वतीने लिहित आहे. महाविकास आपाडीच्या बैठकीस बाळासाहेब आंबेडकर आणि सिद्धार्थ मोकळे, राज्य उपाध्यक्ष हजर होते.

    राज्य कार्यकारिणीला मिळालेल्या माहितीवरून असे दिसून येत आहे की महाविकास आघाडीच्या अंतर्गत जागावाटप अद्याप प्रलंबित आहे. ह्यात भारतीय राष्ट्रीय कॉग्रिस आणि शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांचा १० जागांवर आणि तीनही पक्षात ५ जागांवर अशा एकूण ४८ पैकी १५ जागांवर निर्णय होत नाही (tie आहे) अशी परिस्थिती आहे.

    भाजप-आरएसएसच्या नीच विभाजनकारी आणि लोकशाही विरोधी अजेंड्यांविरुद्ध सातत्याने ठामपणे आणि बेधडकपणे उभा असलेला आमचाच पक्ष आहे. आम्ही जागा वाटपाच्या बाबतीत महाविकास आघाडीचे दिरंगाईचे धोरण आणि अनिर्णायक दृष्टिकोनाबद्दल चिठित आहोत. २ फेब्रुवारी आणि २७ फेब्रुवारी च्या बैठका नंतरच्या महाविकास आघाडीच्या अंतर्गत चर्चेत आम्हाला वगळले गेले, महाविकास आपाडीची ही संघपणाची आणि आम्हाला टाळण्याची भूमिका असली तरीही महाविकास आघाडी बदल आम्ही सकारात्मक आहोत, २०१८ साली झालेल्या पक्ष स्थापनेपासून, वंचित बहुजन आघाडीचा पाया दलित, आदिवासी, बहुजन, भटके विमुक्त, गरीब पराठा आणि मुस्लीम समूहांमध्ये वेगाने विस्तारत असतांना महाबिकास आघाडीच्या बैठकीत बंचित बहुजन आघाडीला केवळ २ जागा देऊ केल्या

    हे मतदारसंघ ज्या जिल्ह्यातील आहेत तेथील आमच्या जिल्हा कार्यकारिणी बरोबर चर्चा केली असता असे जाणवले की, ह्या मतदारसंघात आमचे काम असले तरी महाविकास आघाडीचे अस्तित्व कमी आहे आणि त्यांना ह्या मतदार संघात जनाधार कमी आहे आणि त्यामुळे पंचित बहुजन आपाहीसाठी ही बाब अडचणीची व प्रासदायक आहे. तसेच हे अधोरेखित केले पाहीजे की मागील २-३ निवडनुकामध्ये महाविकास आघाडीच्या पटक पक्षापैकी कोणीही ह्या जागा जिंकलेल्या नाहीत, जाणीवपूर्वक ‘हरणाऱ्या जागा वचित बहुजन आपाहीला धावच्या आणि उर्वरित मतदारसंघात वचित बहुजन आघाडीच्या लक्षणीय मतदाराचा पाठींबा मिळवायचा हा हेतू महाविकास आश्यादीच्या पदक पक्षांचा आहे असे वंचित बहुजन आपाडीच्या जिल्लाले आहे आपली लक्षणीय मते हवीत पन हिंदू शकणाऱ्या जागा वचित बहुजन आधाडीला द्यायच्या नाहीत हेच मी आचे धोरण आहे हा यह कार्यकत्यांचा होत आहे.

    बंचित बहुजन आघाडीला सन्मानजनक (संख्या) आणि जिंकण्याची शक्यता असणान्या जागा द्याव्यात, महाविकास आघाडीला टाकाऊ वाटणाऱ्या जागा नकोत ही वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची विनंती आहे. आज शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि राष्ट्रवादी कॉग्रेस (शरदचंद्र पवार) हे दोन्ही पक्ष विभाजित झालेले पक्ष आहेत. आणि कॅप्रिंसच्या माजी मुख्यमंत्र्यांसह अनेक नेते भाजप मध्ये गेले आहेत आणि काही वाटेवर आहेत. ह्या पार्श्वभूमी वर महाविकास आघाडीने फक्त स्वत:च्या फायद्याच्या भूमिकेतून न बघता वंचित बहुजन आघाडी कडे वंचित समूहांच्या आकांक्षांचे प्रतिनिधित्व करणारी एक सक्षम राजकीय शक्ती म्हणून बघणे महत्वाचे आहे.

    ‘वंचित बहुजन आपाड़ी हा आदर देण्याच्या योग्यतेचा पक्ष नाही का?’ हा प्रश्न मी बंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने तुम्हा तियां समोर मांडत आहे. आम्ही महाविकास आयाढीचा आदरच करतो, पण सातत्याने चचेतून बाहेर ठेवण्याच्या भूमिके मुळे महाविकास आघाडीला आपली मते हवीत पण आपला सन्मान ठेवला जात नाही ही भावना निर्माण होत आहे. वंचित बहुजन आघाडीची मते हवीत परंतू वंचित बहुजन आपाड़ो हा पक्ष नको अशी ही भूमिका आहे.

    आपण ठरवून आपापसात चर्चा करावी व ९ फेब्रुवारीच्या बैठकीत तुमची भूमिका मांडावी, आपण बदलाल ही अशा आहे. आपली सुती भक्कम व टिकाऊ करण्याचा आमचा प्रयत्न आहे याची आम्ही तुम्हा तिघांना खात्री देत आहोत.

    रेखा ठाकुर, प्रदेशाध्यक्ष

    वंचित बहुजन आघाडी

    महाराष्ट्र प्रदेश

    Do you invite us by giving away 2 lost seats??; Letter bomb of Ambedkar’s deprivation on Thackeray + Pawar + Thorat!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस