• Download App
    नामांतर करण्याची हिंमत नाही; पण दौऱ्याच्या अधिकृत शासकीय पत्रकात औरंगाबादचे केले संभाजीनगर|Do not dare to rename; But in the official gazette of the tour, Sambhajinagar of Aurangabad did

    नामांतर करण्याची हिंमत नाही; पण दौऱ्याच्या अधिकृत शासकीय पत्रकात औरंगाबादचे केले संभाजीनगर

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करावे अशी मागणी करणाºया शिवसेनेने कॉँग्रेस- राष्ट्रवादीला घाबरून नामांतराचा निर्णय घेण्याची धमक दाखविलेली नाही. मात्र, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यातील अधिकृत शासकीय पत्रकात औरंगाबादचे संभाजीनगर करण्यात आले आहे.Do not dare to rename; But in the official gazette of the tour, Sambhajinagar of Aurangabad did

    राज्याचे पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर येणार होते. हा दौरा रद्द झाला. मात्र, त्याची माहिती देणाºया सरकारी पत्रकात औरंगाबादच्या ऐवजी संभाजीनगर असे वापरले. शासनाच्या प्रथेप्रमाणे संबंधित विभागांना त्याची माहिती देण्यासाठी पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार कार्यालयाने 25 रोजी दौऱ्याची कार्यक्रम पत्रिका जाहीर केली.



    यात सुरूवातीपासून अखेरपर्यंत औरंगाबाद ऐवजी संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे. दौरा पत्रिकेच्या अखेरीस या खात्याचे विशेष कार्य अधिकारी डॉ.प्रफुल्ल बनसोडे यांची स्वाक्षरी आहे.पत्रिकेत तब्बल 12 वेळेस संभाजीनगर असा उल्लेख आहे.

    विशेष म्हणजे औरंगाबादचे राजशिष्टाचार अधिकारी, विभागीय आयुक्त, पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक आणि मनपा आयुक्तांच्या कार्यालयासमोरही संभाजीनगर असेच म्हंटले आहे. एखाद्या ठिकाणी नजर चुकीने औरंगाबाद ऐवजी संभाजीनगर उल्लेख होण्याची शक्यता आहे. परंतु प्रत्येक ठिकाणी असा उल्लेख जाणिवपूर्वक केल्याचा आरोप होत आहे.

    औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याची 33 वर्षांपूवीर्ची मागणी आहे. याच मुद्यावर जिल्ह्यातील राजकारण फिरत असते. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी 1988 मध्ये पालिका निवडणूकीतील विजयानंतर घेतलेल्या सभेत औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख केला. तेव्हापासून शिवसेनेकडून संभाजीनगर असाच उल्लेख होतो. काँग्रेससह राष्ट्रवादी व एमआयएमचा यास विरोध आहे.

    Do not dare to rename; But in the official gazette of the tour, Sambhajinagar of Aurangabad did

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस