• Download App
    दिवाळी विशेष; आज "या" मुहूर्तावर आणि "असे" करा लक्ष्मीपूजन!! । Diwali special; Do Lakshmi Pujan today at this moment and do it like this !!

    दिवाळी विशेष; आज “या” मुहूर्तावर आणि “असे” करा लक्ष्मीपूजन!!

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : दिवाळीत लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व असते. अश्विन अमावास्येस वृषभ लग्नावर लक्ष्मीपूजन करणे उत्तम फलदायी मानले जाते. या दिवशी प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीचे पूजन केले जाते. यंदा लक्ष्मीपूजन हे आज ४ नोव्हेंबर २०२१ या दिवशी आहे. लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त हा संध्याकाळी ६ ते ८.३० वाजेपर्यंत वृषभ लग्नावर आहे. Diwali special; Do Lakshmi Pujan today at this moment and do it like this !!

    असे करावे लक्ष्मी पूजन

    • लक्ष्मीपूजन करताना चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र घालून त्याभोवती रांगोळी काढावी.
      चौरंगावर अक्षतांचे स्वस्तिक काढून त्यावर कलश ठेवावे. कलशावर नारळ ठेवून, कमळाचे फूल व लक्ष्मीची मूर्ती स्थापित करावी. श्रीसुक्ताच्या सोळा आवर्तनांनी लक्ष्मीची आराधना करावी. श्री गणेश, श्री लक्ष्मी आणि श्री कुबेर यांचे एकत्र पूजन करावे.
    • या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिला, लक्ष्मी मानून तिच्यावर हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात.
    • लक्ष्मी पूजनाच्या वेळी दारे, खिडक्या उघड्या ठेवाव्यात तसेच लक्ष्मीसमोर दिव्याची अखंड ज्योत तेवत राहील याची योग्य ती काळजी घ्यावी. देवपूजा करून नैवेद्य अर्पण करावा.

    Diwali special; Do Lakshmi Pujan today at this moment and do it like this !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    बेस्ट कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीची लिटमस टेस्ट!!

    संतशक्तीच्या आशीर्वादाने मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाचा संकल्प!

    Mahayuti महापालिकेच्या प्रभाग रचनेवरून महायुतीत फुट पडणार?