विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातल्या सर्व मोदींना चोर म्हणून त्यांची बदनामी केल्यानंतर केल्याबद्दल सूरत कोर्टाने राहुल गांधींना दोन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर राहुल गांधींची खासदारकी रद्द झाली आहे. पण राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने फार मोठा बबाल उभा केला आहे. देशभर आंदोलनाचा धडाका लावला आहे. पण एखाद्या खटल्यात गुन्हा शाबित होऊन खासदारकी रद्द झालेले राहुल गांधी हे काही एकमेव खासदार नाहीत. याआधी देखील गेल्या 10 वर्षांमध्ये तब्बल 11 बड्या नेत्यांच्या आमदारक्या आणि खासदारक्या रद्द झाल्या आहेत. Disqualification : not only rahul Gandhi but lalu Yadav, jaylalitha and other 10 MPs and MLAs faced it
विशेष म्हणजे यामध्ये काँग्रेस सह बाकी सर्वच पक्षांच्या आमदार – खासदारांचा समावेश आहे. विविध प्रकारच्या खटल्यांमध्ये गुन्हे शाबित होऊन ज्या बड्या नेत्यांच्या आमदारक्या रद्द झाल्या, त्यामध्ये राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव, अण्णाद्रमुकच्या प्रमुख जयललिता यांच्यासारखे माजी मुख्यमंत्री आहेतच, पण बाहुबली म्हणून सामाजिक गुंड प्रवृत्ती असलेल्या समाजवादी पक्षाचे आझम खान, अब्दुल आजम खान, आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहम्मद फैजल यांचाही समावेश आहे. लालूप्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यात शिक्षा झाली म्हणून तसेच जयललिता यांना अवैधरित्या संपत्ती जमवल्याबद्दल आमदारकी गमवावी लागली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर खुनी हल्ला केल्याचा गुन्हा शाबित झाला आहे. अर्थात त्याला केरळ हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. पण तरीही त्यांची खासदारकी रद्द झाली आहे.
त्याचबरोबर भाजपचे विक्रम सिंह सैनी आणि कुलदीप सेंगर यांच्या आमदारक्याही रद्द झाले आहेत. विक्रम सिंह सैनी यांच्यावर दंगल भडकवण्याचा गुन्हा साबित झाला होता, तर कुलदीप सेंगर यांच्यावर बलात्काराचा गुन्हा साबित झाला. कुलदीप सिंगर हे समाजवादी पार्टीतून भाजपमध्ये आले होते.
या खेरीज प्रदीप चौधरी, अनंतसिंह आणि अनिल कुमार सैनी या हरियाणा आणि बिहार आणि मधील आमदारांच्या आमदारक्या प्रतिस्पर्ध्यावर खुनी हल्ला शस्त्र तस्करी आणि आर्थिक घोटाळ्याचे गुन्हे शाबित झाल्यामुळे रद्द झाल्या आहेत.
राहुल गांधी यांच्या खेरीस अन्य 10 लोकप्रतिनिधींच्या आमदारक्या रद्द झाल्यानंतर स्थानिक पातळीवर मोठा गदारोळ झाला होता. जयललिता आणि लालूप्रसाद यादव यांचे प्रादेशिक पक्ष असल्यामुळे तामिळनाडू आणि बिहारमध्ये राजकीय खळबळ माजली होती. पण यापैकी कोणाची खासदारकी अथवा आमदारकी रद्द झाल्यानंतर फार मोठा बवाल झाला नव्हता. तो बवाल राहुल गांधींची खासदारकी गेल्यानंतर झाला आहे.
Disqualification : not only rahul Gandhi but lalu Yadav, jaylalitha and other 10 MPs and MLAs faced it
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदी ‘वन वर्ल्ड टीबी समिट’ला संबोधित करणार; वाराणसीला देणार १ हजार ७८० कोटींची भेट
- ‘’आमची कधी बंद दाराआड बैठक झाली तर…’’ फडणवीसांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचं विधान!
- उद्धव ठाकरे म्हणतात मी राज ठाकरेंचं कालचं भाषण ऐकलंच नाही, कारण…
- माहीम, सांगली कुपवाड, मुंब्रा पाठोपाठ नाशिक मध्येही बेकायदा दर्गे, मशिदींविरुद्ध एल्गार; नवशा गणपती शेजारील दर्गा टार्गेटवर!!