• Download App
    बहुमतातले सरकार बरखास्त करणे पोरखेळ आहे का? संजय राऊत यांचा सुधीर मुनगंटीवार यांना सवाल|Dismissed majority government Is it child's play? : sanjy Raaut

    WATCH : बहुमतातले सरकार बरखास्त करणे पोरखेळ आहे का? संजय राऊत यांचा सुधीर मुनगंटीवार यांना सवाल

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : उद्धव ठाकरेंची धमकी काय असते, याचा अनुभव महाराष्ट्रात घेतो आहे. मी राज्यपाल आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही ओळखतो. ते महाराष्ट्रात आले नव्हते, तेव्हापासून त्यांचे आणि माझे चांगले संबंध आहेत.Dismissed majority government Is it child’s play? : sanjy Raaut

    राज्यपालांना कोण धमकी देणार? हा साधा सरळ विषय आहे. विधानसभा अध्यक्षपदावरून भ्रम निर्माण झाला. राज्यपालांनी कळवलं. आम्ही मान्य केलं. ते अत्यंत सभ्य गृहस्थ, सुस्वभावी आहेत.



    पोलिस भरती गैरव्यवहाराची कागदपत्रे माझ्याकडे आली होती. ती मी मुख्यमंत्र्यांकडे दिली आहेत. हे प्रकरण गंभीर आहे, राज्य सरकार बरखास्त नाही केले, तर नाव बदलू, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते. या वाक्याच्या संदर्भ घेत राऊत म्हणाले की, त्यांना नाव बदलावेच लागेल

    मला त्यांचे नाव आवडते. मात्र, त्यांच्यासाठी नाव बदलण्याची व्यवस्था करू. बहुमतातले सरकार बरखास्त करणे पोरखेळ आहे का, राष्ट्रपती तुमच्या घरी चंद्रपुरात, जंगलात गोट्या खेळत आहे का, त्यांचा स्टांप आणून ठेवलाय का, असा सवाल त्यांनी केला.

    नारायण राणे यांनी पोलिसांना सहकार्य करावे. गुन्हेगारांना पाठिशी घालू नये. नितेश पाताळात लपले असतील तरी त्यांना शोधून काढू, असा दावा बुधवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. ते नाशिकमध्ये बोलत होते. एकीकडे सिंधुदुर्ग न्यायालयात नीतेश यांच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे, तर दुसरीकडे संजय राऊत यांनी राणे पिता-पुत्रांवर टीकेची झोड उठवली.

    • सरकार बरखास्त करणे पोरखेळ आहे का?
    • संजय राऊत यांचा सुधीर मुनगंटीवार यांना सवाल
    • राष्ट्रपती चंद्रपुरात, जंगलात गोट्या खेळत आहेत का?
    • त्यांचा स्टांप आणून ठेवलाय का?
    • पोलिस नितेश राणेंना शोधत आहेत
    •  आपण केंद्रीय मंत्री राणे पोलिसांना सहकार्य करा
    • कायद्या पासून महत्वाची माहिती लपवू नका
    • आपला मुलगा असेल तरी माहिती देणे गरजेचे
    • आरोपीना पाठीशी घातलं म्हणून गुन्हा दाखल

    Dismissed majority government Is it child’s play? : sanjy Raaut

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!