पत्रात त्यांनी जिल्हा बँकेत भ्रष्ट्राचार झाला असा असून सुनील केदार यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. dismiss Sunil Kedaar from the Cabinet, , Ashish Deshmukh demanded a letter to the Chief Minister Uddhav Thackeray
विशेष प्रतिनिधी
नागपूर : राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने त्यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करावे’, अशी थेट मागणी करणारे पत्र माजी आमदार व काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
आशिष देशमुख यांनी याबाबत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी जिल्हा बँकेत भ्रष्ट्राचार झाला असा असून कारवाई केदार यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
सुनिल केदार हे 2002 मध्ये नागपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी बँकेचे 150 कोटी रुपये खाजगी दलालांमार्फत रोख्यांमध्ये गुंतवले आणि बँकेचं 150 कोटी रुपयांचं नुकसान केल्याचा आरोप सुनिल केदार यांच्यावर आहे.
या घोटाळ्याप्रकरणी केदार आणि इतर 10 आरोपींविरुद्ध महाराष्ट्र राज्याच्या सहकार खात्यानं कोर्टात खटला दाखल केला आहे.हा खटला गेली 19 वर्षे कोर्टात सुरु आहे. आता या प्रकरणी सरकारी वकील म्हणून असिफ कुरेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
असिफ कुरेशी हे काँग्रेसच्या लीगल सेलचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे ते या खटल्यात योग्य बाजू मांडू शकत नसल्याचा आरोप करत अॅडव्होकेट असिफ कुरेशी यांची नेमणूक रद्द करावी अशी मागणी आशिष देशमुख यांनी केली आहे.
dismiss Sunil Kedaar from the Cabinet, Ashish Deshmukh demanded a letter to the Chief Minister Uddhav Thackeray
महत्त्वाच्या बातम्या
- दिशा सालियन खून प्रकरणातील मंत्र्याला आत मध्ये घालू; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा इशारा
- तुमच्या आधार कार्डवरील फोटो जुना झालाय? या सोप्या पद्धतीने टाका आपला आवडता फोटो
- काबूल विमानतळावर हल्लेखोर आणि अफगाण सुरक्षा दलांमध्ये चकमक; एक सैनिक ठार, तीन जखमी
- WATCH :सफेद भेंडीच्या उत्पादकांना अच्छे दिन ! सफेद भेंडीचा दर वधारला, शेतकरी आनंदले