वृत्तसंस्था
मुंबई – दिशा सालियन संशयास्पद मृत्यू प्रकरणाचे पुरावे आम्ही कोर्टात सादर करू, असे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आज स्पष्ट केले आहे. दिशाच्या मृत्यू प्रकरणावर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे य़ांच्याविरोधात मालवणी पोलीस स्टेशन मध्ये एफआयआर दाखल झाला आहे. त्यांना पोलीसांनी नोटीस पाठविली आहे.disha salian death case – will submit proofs in court, says nitesh rane
पोलीसांची नोटीस मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी वरील खुलासा केला आहे. पोलीसांची नोटीस मिळाली आहे. त्यांना वकिलामार्फत प्रत्युत्तर देणार तसेच दिशा सालियन मृत्यू प्रकरणात कोर्टात पुरावे देखील सादर करणार आहोत, असे नितेश राणे यांनी स्पष्ट केले आहे.
दिशा सालियन हिच्यावर बलात्कार करून तिचा खून केल्याचा आरोप नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केला होता. त्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या दिशा सालियनच्या घरी जाऊन पालकांना भेटल्या होत्या.
किशोरी पेडणेकरांसमवेत दिशा सालियनच्या पालकांनी पत्रकार परिषद घेऊन दिशाच्या मृत्यूनंतर बदनामी करणे थांबवा, अशी विनंती केली होती. त्यानंतर मालवणी पोलीस स्टेशनमध्ये नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या विरोधात एफआयआर दाखल करून त्यांना नोटीस पाठविली आहे.
या पार्श्वभूमीवर या नोटीशीला प्रत्युत्तर देण्याचे आणि दिशाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात काही पुरावे कोर्टात सादर करण्याचे वक्तव्य नितेश राणे यांनी केले आहे.