Friday, 9 May 2025
  • Download App
    पवार + आंबेडकर + नाना + राऊतांच्या बैठकीत अत्यंत महत्त्वाचा निर्णय; पुन्हा एकदा बसू!!discussion was positive and that further discussions would take place in the next meeting

    पवार + आंबेडकर + नाना + राऊतांच्या बैठकीत अत्यंत महत्त्वाचा निर्णय; पुन्हा एकदा बसू!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : लोकसभा निवडणूक ऐन तोंडावर आली असताना महाविकास आघाडीतले सगळे प्रमुख नेते महाराष्ट्रातल्या जागावाटपाबाबत अत्यंत गंभीर विचारविनिमय करत आहेत. त्यांच्या किमान चार ते पाच चर्चेच्या फेऱ्या आधीच झाल्या आहेत. आज देखील महाविकास आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात संजय राऊत, जितेंद्र आव्हाड तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर मुंबईच्या हॉटेलवर सिझन्स मध्ये भेटले. त्यांनी तिथे तब्बल चार तास चर्चा केली आणि अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला, तो म्हणजे आपण पुन्हा एकदा बसू!! discussion was positive and that further discussions would take place in the next meeting

    “पुन्हा एकदा बसू” हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेऊन या सर्व नेत्यांनी आजची बैठक संपवली आणि ते आपापल्या निवासस्थानांकडे रवाना झाले.

    आजच्या बैठकीनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. चारही पक्षांच्या नेत्यांमध्ये अतिशय सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती दिली.
    महाविकास आघाडीची जागावाटप संदर्भात आणि पुढली रणनीती संदर्भात आज बैठक झाली. आजच्या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, मी स्वत: होतो. मुख्य म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे स्वतः उपस्थित होते. चारही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये उत्तम चर्चा झाली. चर्चा अतिशय सकारात्मक झाली. जागावाटपात कोणतेही मतभेद नाहीत. एकाही जागेवर मतभेद नाहीत, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

    आंबेडकरांना एका गोष्टीची खात्री

    प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या जागेचा प्रस्ताव दिला आहे. त्या जागांवर चर्चा झाली. आमच्याबरोबर प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष आमच्यासोबत असावा, अशी आमची भूमिका आहे. आम्ही एकत्र निवडणूक लढणार असं निश्चित केलं आहे. सर्व गोष्टी जवळपास निश्चित झाल्या आहेत. जागावाटपाविषयी आम्ही एकत्र बसून घोषणा करु. प्रकाश आंबेडकरांना एका गोष्टीची पूर्ण खात्री आहे की, त्यांना मोदींची हुकूमशाही उलथून टाकायची आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र राहायला पाहिजे याबाबत त्यांचे आणि आमचे एकमत आहे, असे संजय राऊत म्हणाले.

    आघाडीत 39 जागांवर एकमत, पण…

    महाविकास आघाडीच्या बैठकीबाबत सूत्रांकडून महत्त्वाची माहिती समोर आली. राज्यातील 48 पैकी 39 जागांवर आघाडीच्या सर्व नेत्यांचे एकमत झाले आहे. पण 9 जागांचा तिढा अजूनही कायम आहे. पण हा तिढा लवकरच सोडवला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आजच्या बैठकीत आपला प्रस्ताव ठेवला. ते बैठकीतून बाहेर पडले तेव्हा त्यांनी आजच्या बैठकीत काहीच निर्णय झाला नसल्याचे सांगून ते निघून गेले. माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला काय दिसते असा प्रतिप्रश्न त्यांनी गाडीत बसताना पत्रकारांनाच केला. पण आजच्या बैठकीत ठरलेला निर्णय “पुन्हा बसू” ही बैठक 9 मार्च रोजी होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.

    discussion was positive and that further discussions would take place in the next meeting

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Akhand Bharat : नागपूरच्या झिरो माईल येथे ‘अखंड भारत एक्सपिरियन्स सेंटर’सह अनेक प्रकल्पांना मंजुरी

    Finance Commission : वित्त आयोगाकडून महाराष्ट्राच्या आर्थिक शिस्तीचे कौतुक

    पवारांनी स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेसची केली “चव्हाण + रेड्डी काँग्रेस”; पुढच्या पिढीला दिले एकत्रीकरणाचे अधिकार!!

    Icon News Hub