- 25 कोटीचा धनादेश शेअर करत केली घोषणा ..
विशेष प्रतिनिधी
पुणे : ” द केरला स्टोरी” या सिनेमानं मनोरंजन विश्वात अनेक विक्रम मोडले .. अनेक प्रकारे टीका झाली .. समाज माध्यमातून या सिनेमाबाबत दोन्ही बाजूंनी वाद प्रतिवाद झाले मात्र .. प्रसिद्धीच्या बाबतीत हा चित्रपट यशस्वी ठरला .. कमाईचे अनेक नवे विक्रम प्रस्थापित करत या सिनेमाने बॉक्सऑफिस वर राज्य केलं.. Director Sudipto Sen’s new upcoming movie..
ज्याप्रमाणे गेली अनेक दिवस हा सिनेमा चर्चेत आहे. तसेच या चित्रपटातील स्टारकास्ट आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक निर्माते देखील चर्चेत आहेत..
द केरला स्टोरी नंतर दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी नव्या कोऱ्या सिनेमाचीं घोषणा केली आहे..त्यांचा आगामी चित्रपट ज्येष्ठ उद्योगपती सुब्रत रॉय यांच्या जीवनावर आधारित असणार आहे.सेन निर्माते संदीप सिंग यांच्या सोबत कामं करणार आहेत..अशी माहिती त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांना दिली ..
हा चित्रपट ज्येष्ठ उद्योगपती सुब्रत रॉय यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. या बायोपिकचे नाव सहाराश्री असं असणार आहे. सहाराश्री या चित्रपटासाठी गीतकार गुलजार हे गीत लेखन करणार आहेत .. तरी या सिनेमाचं संगीत ए आर रहमान हे देणार आहेत..
मात्र सुब्रत रॉय यांची भूमिका कोण साकारणारे हे अजून गुलदस्तात आहे .. त्यासाठी बॉलीवूड मधील अनेक बड्या अभिनेत्यांशी बोलणं सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.. इंडिया टुडे यांनी सुदीप्तो सेन यांना 2012 या वर्षातील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणून घोषित करण्यात आलं होतं ..
Director Sudipto Sen’s new upcoming movie..
महत्वाच्या बातम्या
- धुळ्यातील टिपू सुलतानच्या बेकायदेशीर स्मारकावर बुलडोझर, AIMIM आमदाराने उभारले होते, हिंदू संघटनांच्या तक्रारीनंतर कारवाई
- नवीन ‘’डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन बिल’’ लवकरच संसदेत सादर केले जाणार – राजीव चंद्रशेखर
- WATCH : ‘गोडसेही भारताचे सुपुत्र, औरंगजेब आणि बाबरसारखे आक्रमक नव्हते’, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांचे वक्तव्य
- क्रिकेट चाहत्यांचा फायदा, जियोनंतर आता हॉटस्टार मोफत दाखवणार ICC क्रिकेट वर्ल्डकप, OTT स्पर्धेचा परिणाम