• Download App
    'या' कारणासाठी सोडला महेश मांजरेकर यांनी सावरकरांवरील चित्रपट अभिनेत्यावर आरोप करत, सांगितलं कारण Director Mahesh Manjrekar news

    ‘या’ कारणासाठी सोडला महेश मांजरेकर यांनी सावरकरांवरील चित्रपट अभिनेत्यावर आरोप करत, सांगितलं कारण

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : गेल्या काही महिन्या पासून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर आधारित बिग बजेट मोठा सिनेमा येऊ घातलाय. या सिनेमाची समाज माध्यमातून वेगवेगळ्या पातळ्यांवर चर्चा सुरू आहे. सुरुवातीला या सिनेमाचं दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर करणार होते अशा बातम्या आल्या. त्यांच्या देखरेखित काही काळ या सिनेमाचं कामही सुरू झालं. मात्र काही कारणास्तव महेश मांजरेकर हा सिनेमा दिग्दर्शित करत नाहीत अशाही बातम्या आता येऊ लागल्या आहेत. Director Mahesh Manjrekar news

    बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणदीप हुडा या चित्रपटामध्ये सावरकरांच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र यात मांजरेकर यांनी दिग्दर्शन करणार नसल्याचे सांगून खळबळ उडवून दिल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून सावरकरांच्या आयुष्यावरील चित्रपटाची चर्चा सुरु आहे. मांजरेकरांच्या या नकारा मागील मुख्य कारण रणदीप हुडा असल्याचे दिसून आले आहे.

    बॉलीवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीमध्ये मांजरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.मांजरेकर म्हणाले की, मी या चित्रपटाचा खूपच गांभीर्यानं विचार करत होतो. मला तो काही केल्या पूर्णही करायचा होता. मात्र रणदीपनं त्याची चित्रपटातील लुडबूड काही थांबवली नाही. तो बऱ्याच गोष्टींमध्ये त्याची मतं देऊ लागला. आणि मला ते खटकू लागलं. यामुळे मग मी हा चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला. असे मांजरेकरांनी यावेळी सांगितले.रणदीपनं या चित्रपटामध्ये खूप सारे बदल करण्याची सुचन केली. मला ते बदल करावेसे वाटले नाहीत. त्याच्या दृष्टीनं ते महत्वाचे होते.

    मुळात जर कथानकावर अमूक एखाद्या गोष्टीचा परिणाम होत असेल तर त्या बदलल्या तर आपण समजू शकतो. पण त्याचा कोणताही परिणाम होत नाही म्हटलं तरीही त्या बदलून आपण वेळ आणि पैसा दोन्हीही व्यर्थ करतो. असे माझे मत होते. मांजरेकर यांनी या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.सुरुवातीला रणदीपनं मला त्याच्या रिसर्चनं अन् लूक्सनं प्रभावित केले होते. मला ते आवडले देखील. तो सावरकरांच्या आयुष्यावरील त्या चित्रपटामध्ये खूपच रस घेत होता. त्यानं त्यासाठी खूप वाचनही केलं होतं. त्याला पहिला ड्राफ्ट वाचून दाखवला त्यात त्यानं काही सुचना केल्या होत्या.

    नंतर त्यानंतर सेकंड ड्राफ्टमध्ये काही बदल सांगितले. ते पुन्हा वाढत गेले. मग यामुळे बराच गॅप पडला. असे मांजरेकर म्हणाले.रणदीपला त्या चित्रपटामध्ये अनेक गोष्टी हव्या होत्या. त्याला हिटलरशी संबंधित काही मुद्दे आणि संदर्भ चित्रपटात घ्यायचे होते. एवढचं नाही तर त्याला इंग्लंडच्या राजाचे, इंग्लंडच्या पंतप्रधानांशी संबंधित काही गोष्टी चित्रपटात हव्या होत्या. मात्र एक दिग्दर्शक म्हणून मला त्या गोष्टी महत्वाच्या वाटल्या नाहीत. कदाचित रणदीपनं प्रमाणापेक्षा जास्त वाचन केल्यानं त्याचा गोंधळ सुरु झाला होता. त्याचा परिणाम आमच्या नात्यावर झाल्याचे दिसून आले.

    Director Mahesh Manjrekar news

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!