• Download App
    दिग्दर्शक केदार शिंदे यांना राजकारणाचे वेध. योग्य वेळ येताच राजकारणात प्रवेश करणार आणि योग्य पक्षाला | Director Kedar Shinde.

    दिग्दर्शक केदार शिंदे यांना राजकारणाचे वेध.योग्य वेळ येताच राजकारणात प्रवेश करणार आणि योग्य पक्षाला पाठिंबा देणार; शिंदे चा मोठा खुलासा 

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : बाई पण भारी देवा! या चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे. सध्या चांगलेच चर्चेत आहेत. सैराट नंतर बाई पण भारी देवा हा सिनेमा महाराष्ट्राचा महा सिनेमा ठरतोय. अवघ्या पाच कोटी मध्ये तयार झालेला सिनेमा लवकरच 100 कोटीच्या क्लब मध्ये जमा होणार असल्याचं बोललं जात आहे. या सिनेमाला भरभरून यश मिळाल्यानंतर केदार शिंदे यांच्याबाबत अनेक चर्चा होताना दिसतायेत. Director Kedar Shinde.

    नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत केदार शिंदे यांनी एक खुलासा केला आहे.योग्य वेळ आल्यावर लवकरच राजकारणात प्रवेश करतील आणि योग्य पक्षाला पाठिंबा देतील असं त्यांनी आपल्या मुलाखतीत सांगितलं आहे.केदार शिंदे राजकारणात येणार केदार शिंदे यांनी मराठी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते राजकारणात येणार आणि कोणत्या पक्षाला आणि नेत्याला सपोर्ट करणार याचा खुलासा केलाय.



    केदार शिंदेंनी जी मुलाखत दिली त्यानुसार, केदार शिंदेंना राजकारणात जायचं आहे. सध्याच्या राजकारणावर भाष्य करण्याची त्यांची इच्छा नाही. पण केदार यांना मैदानात येऊन लढायचं आहे. त्यांना ही योग्य वेळ वाटते.केदार शिंदे या नेत्याला करणार सपोर्टकेदार शिंदेंनी खुलासा केला की, जेव्हा मी स्वतः राजकारणात उतरेल तेव्हा मला काही बोलण्याचा अधिकार असेल.

    मनोरंजन विश्वातुन आर्थिक स्थैर्य मिळालं की, केदार राजकारणात जाण्याचा विचार करतील. केदार शिंदेंच्या पडत्या काळात राज ठाकरेंनी त्यांना साथ दिली याची त्यांना जाणीव आहे. त्यामुळे भविष्यात राजकारणात आल्यावर मनसे प्रमुख राज ठाकरेंना सपोर्ट करण्याची केदार यांना इच्छा आहे. याशिवाय केवळ उदरनिर्वाहासाठी राजकारण न करता मनोरंजन क्षेत्राच्या विकासासाठी काहीतरी करण्याचा केदार शिंदेंचा विचार आहे.

    Director Kedar Shinde.

    महत्वाच्या बातम्या 

     

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !