प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील ६०८ ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ सप्टेंबरला मतदान होणार आहे. या ग्रामपंचायतींमध्ये शुक्रवारपासून आचारसंहिता लागू झाली असून, १९ सप्टेंबर रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी शुक्रवारी केली. Direct election of 608 gram panchayats and sarpancha in Maharashtra
सुप्रीम कोर्टाच्या १७ मे २०२२ रोजीच्या आदेशानुसार पावसामुळे निवडणूक कार्यक्रम बाधित होण्याची शक्यता कमी असलेले ५१ तालुके निवडून तेथील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर निवडणूक कार्यक्रमाच्या कोणत्याही टप्प्यावर अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीसारखी नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास त्याबाबत राज्य निवडणूक आयोगास तात्काळ अहवाल सादर करावा, असे आदेशही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती मदान यांनी दिली.
संबंधित तहसीलदार १८ ऑगस्ट रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. २४ ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत अर्ज दाखल करण्यात येतील. २ सप्टेंबरला अर्जांची छाननी होईल. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ६ सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल, असेही सांगण्यात आले.
असे होईल मतदान
१८ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. मतमोजणी १९ सप्टेंबरला होईल. समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा देय आहेत, अशीही माहिती मदान यांनी दिली.
जिल्हानिहाय ग्रामपंचायती
- नंदुरबार : शहादा- ७४, नंदुरबार- ७५.
- धुळे : शिरपूर- ३३.
- जळगाव : चोपडा- ११ व यावल- २.
- बुलढाणा : जळगाव (जामोद)- १, संग्रामपूर- १, नांदुरा- १, चिखली- ३ व लोणार- २.
- अकोला: अकोट- ७ व बाळापूर- १.
- वाशीम: कारंजा- ४.
- अमरावती: धारणी- १, तिवसा- ४, अमरावती- १ व चांदुर रेल्वे- १.
- यवतमाळ: बाभुळगाव- २, कळंब- २, यवतमाळ- ३, महागाव- १, आर्णी- ४, घाटंजी- ६, केळापूर- २५, राळेगाव- ११, मोरगाव- ११ व झरी जामणी- ८.
- नांदेड: माहूर- २४, किनवट- ४७, अर्धापूर- १, मुदखेड- ३, नायगाव (खैरगाव)- ४, लोहा- ५, कंधार- ४, मुखेड- ५, व देगलूर- १.
- हिंगोली: (औंढा नागनाथ)- ६. परभणी: जिंतूर- १ व पालम- ४.
- नाशिक: कळवण- २२, दिंडोरी- ५० व नाशिक- १७.
- पुणे: जुन्नर- ३८, आंबेगाव- १८, खेड- ५ व भोर- २.
- अहमदनगर: अकोले- ४५.
- लातूर: अहमदपूर- १.
- सातारा: वाई- १ व सातारा- ८.
- कोल्हापूर: कागल- १
Direct election of 608 gram panchayats and sarpancha in Maharashtra
महत्वाच्या बातम्या
- काश्मिरात पुन्हा टार्गेट किलिंग : बांदीपोरामध्ये दहशतवाद्यांनी बिहारच्या मोहम्मद अमरेजवर झाडल्या गोळ्या
- ट्रम्प यांच्या घरावर छाप्यांचा मोठा खुलासा, आण्विक कागदपत्रांच्या शोधात गेली होती FBI
- ADRचा अहवाल : महाराष्ट्रातील 20 पैकी 15 मंत्र्यांविरुद्ध गुन्हेगारी खटले; 11 मंत्री पदवी, पदव्युत्तर पदवीधारक
- ममता बॅनर्जींना आणखी एक धक्का : निकटवर्तीय अणुव्रत मंडल यांना अटक, 8 आयपीएस अधिकाऱ्यांना समन्स