• Download App
    दिलीप वळसे पवारांविषयी वास्तव बोलले, पण टीका होताच माघारी फिरले!!|Dilip Walse spoke the truth about Pawar, but turned back as soon as he got criticized!!

    दिलीप वळसे पवारांविषयी वास्तव बोलले, पण टीका होताच माघारी फिरले!!

    प्रतिनिधी

    पुणे :  शरद पवारांच्या राजकीय कर्तृत्वाविषयी दिलीप वळसे पाटील परखड वास्तव बोलले पण टीकेचे बाण सुटताच माघारी फिरले असे आज घडले!!Dilip Walse spoke the truth about Pawar, but turned back as soon as he got criticized!!

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे एकेकाळचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेले मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या एका वक्तव्याची कालपासून बरीच चर्चा रंगली. शरद पवार यांना महाराष्ट्रात कधीच एकहाती सत्ता आणता आली नाही, असे सांगत दिलीप वळसे पाटील यांनी पवारांच्या राजकीय कर्तृत्वाच्या मर्यादा दाखवून दिल्या होत्या. पण त्यांच्या या वक्तव्यामुळे शरद पवार समर्थक आक्रमक झाले होते. जितेंद्र आव्हाड यांच्यासह शरद पवार गटातील नेत्यांनी दिलीप वळसे पाटील यांचा समाचार घेतला.



    टीकेची राळ उडलेली पाहून दिलीप वळसे-पाटील समोर आले आणि त्यांनी आपल्या मूळ वक्तव्यावर खुलासा केला. मी शरद पवार यांच्याविषयी अवमानजक काहीच बोललो नव्हतो. प्रसार माध्यमांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा वळसे पाटील यांनी केला.

    वळसे पाटलांचा खुलासा

    माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. माझं संपूर्ण भाषण ऐकलं तर मी पवार साहेबांबद्दल असं काही बोललो नाही. पवार साहेबांनी ४० ते ५० वर्ष आपल्या राज्यासाठी आणि देशासाठी काम केलं आहे. देशात अनेक प्रादेशिक पक्ष आहेत. त्यातील अनेक प्रादेशिक पक्ष आपल्या हिमतीवर बहूमत मिळवून सत्तेवर बसतात. परंतु महाराष्ट्रातील जनतेने अशी शक्ती पवार साहेबांच्या सोबत उभी केली नाही, याची मला खंत आहे, आणि ती खंत मी व्यक्त करत होतो. पवार साहेबांना कमी लेखण्याचा किंवा पवार साहेबांना चुकीचं काही बोलण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असा खुलासा वळसे पाटलांनी केला.

    Dilip Walse spoke the truth about Pawar, but turned back as soon as he got criticized!!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!