विशेष प्रतिनिधी
मुंबई : राजकारणात आजही अंतिम शब्द शरद पवारांचा मानतो, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी अजित दादांबरोबर जाऊन भाजपच्या सत्तेच्या वळचणीला बसल्याचे समर्थन केले. dilip walase patil says sharad pawar word is last word
रयत शिक्षण संस्था, वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट राष्ट्रीय साखर कारखाना महासंघ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान अशा संस्थांमध्ये आपण शरद पवारांबरोबर काम करत असतो. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन करण्यासाठी नेहमीच त्यांना भेटतो. तशीच आजची भेट होती, असे दिलीप वळसे पाटलांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात काही तालुक्यांमध्ये दुष्काळ आहे. या संदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या काही निर्णय यांची माहिती शरद पवारांना दिल्याचे वळसे पाटील म्हणाले.
दिलीप वळसे पवारांविषयी वास्तव बोलले, पण टीका होताच माघारी फिरले!!
मात्र, राजकारणात तुमच्यासाठी अंतिम शब्द कोणाचा??, शरद पवारांचा की अजित पवारांचा??, असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी अंतिम शब्द शरद पवारांचाच, असे उत्तर वळसे पाटलांनी दिले. याचा अर्थ शरद पवारांचाच शब्द अंतिम मानून दिलीप वळसे पाटील अजित दादांबरोबर जाऊन भाजपच्या सत्तेच्या वळचणीला बसले असे मानले जात आहे.
राजकीय भूमिका वेगळ्या असल्या तरी संस्थांमध्ये संस्थांच्या कामकाजात शरद पवारांनी कधी राजकारण आणले नाही. कारण त्यात सगळ्याच पक्षांचे लोक काम करतात. संस्थांच्या कारभारात शरद पवारांचा शब्द अंतिम आहे, असेही दिलीप वळसे पाटलांनी स्पष्ट केले.
dilip walase patil says sharad pawar word is last word
महत्वाच्या बातम्या
- Mission Mahagram : ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन आणि IDBI बँक यांच्यात सामंजस्य करार!
- जम्मू-काश्मीर : शोपियान चकमकीत TRF दहशतवादी ठार, दारूगोळा मोठ्याप्रमाणावर जप्त
- ”राहुल गांधी त्याच मंदिरात जातात जिथे बाबरचे…’ हिमंता बिस्वा सरमा यांचा जोरदार हल्लाबोल!
- ”अजून किती खालच्या पातळीवर जाल, जगभरात देशाला अपमानित करत आहात ” मोदींचा विरोधकांवर घणाघात!