NASA’s MSI Fellowships Virtual Panel : औरंगाबादेतील रहिवासी दीक्षा शिंदे या 14 वर्षीय विद्यार्थिनीला अमेरिकी अंतराळ संस्था नासाकडून फेलोशिप मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे. एवढ्या लहान वयात चमकदार कामगिरी केल्यामुळे दीक्षाचे सर्वत्र कौतुक होत आहे. परंतु आता नेटकऱ्यांनीच यावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. एएनआयने शेअर केलेल्या तिच्या सर्टिफिकेट्स आणि थेअरीचे स्क्रीनशॉट्सवरून अनेक युजर्सनी फसवणुकीची शंका उपस्थित केली आहे. Diksha Shinde a 14-yr-old girl in Aurangabad selected as a panellist on NASA’s MSI Fellowships Virtual Panel
वृत्तसंस्था
औरंगाबाद : औरंगाबादेतील रहिवासी दीक्षा शिंदे या 14 वर्षीय विद्यार्थिनीला अमेरिकी अंतराळ संस्था नासाकडून फेलोशिप मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे. एवढ्या लहान वयात चमकदार कामगिरी केल्यामुळे दीक्षाचे सर्वत्र कौतुक होत आहे. परंतु आता नेटकऱ्यांनीच यावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. एएनआयने शेअर केलेल्या तिच्या सर्टिफिकेट्स आणि थेअरीचे स्क्रीनशॉट्सवरून अनेक युजर्सनी फसवणुकीची शंका उपस्थित केली आहे.
काय म्हणाली विद्यार्थिनी?
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दीक्षा शिंदे म्हणाली की, तिने कृष्णविवर आणि देव यावर एक सिद्धांत लिहिला आहे. ती म्हणाली की, जून 2021 मध्ये MSI फेलोशिप व्हर्च्युअल पॅनेलसाठी पॅनेलिस्ट म्हणून तिची निवड झाली. दीक्षा म्हणते, “मी ऑफर स्वीकारली आणि लवकरच काम सुरू करेन.. माझ्या कामात संशोधकांनी सादर केलेल्या प्रस्तावांचे पुनरावलोकन करणे आणि नासासोबत संशोधन करणे समाविष्ट आहे.”
दीक्षाची फसवणूक झाली?
दरम्यान, अनेक संशोधकांनी हे दाखवून दिले आहे की, नासाची एमएसआय फेलोशिप ही केवळ पदवी पूर्ण केलेल्या आणि अमेरिकेत पुढे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आहे. दुसरीकडे, दीक्षाने जे प्रमाणपत्र शेअर केले आहेत त्यामध्ये नासाच्या माजी प्रमुखांचे नाव आहे. दीक्षाच्या प्रमाणपत्रावर नासाचे सीईओ व प्रमुख म्हणून जेम्स ब्राइडेन्स्टाइन आणि डिपार्टमेंट चेअर जेम्स फ्रेडरिक यांचे नाव आहे. परंतु सध्या बिल नेल्सन हे नासाचे अॅडमिनिस्ट्रेटर चीफ आहेत. नासामध्ये सीई अँड प्रेसिडेंट अशी कुठलीही पोस्ट नाही. काही नेटिझन्सनी हे लक्षात आणून दिले की, जेम्स फ्रेडरिक ब्राइडेन्स्टाइन हे 2013 ते 2018 दरम्यान नासाचे अॅडमिनस्ट्रेटर होते. त्यांचेच नाव विभागून वापरण्यात आले आहे.
एएनआयने दिली प्रसिद्धी
कशी मिळाली दीक्षाला फेलोशिप?
दीक्षाने सांगितले आहे की, ती वेळा प्रयत्न केल्यानंतर तिची थेअरी स्वीकारण्यात आली. दीक्षा दावा केला की, नासाने तिला त्यांच्या वेबसाइटसाठी एक लेख लिहायला सांगितला होता. नासामध्ये निवड झाल्यानंतर दीक्षाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. एका पोस्टला आतापर्यंत 4000 हून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. बर्याच जणांनी तिला आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी प्रोत्साहित केले आणि शुभेच्छा दिल्या. यादरम्यान एका ट्विटर युझरने लिहिले की, ती भारताचे उज्ज्वल भविष्य आहे. दीक्षा म्हणाली की, ती दर दुसऱ्या दिवशी संशोधन चर्चेत भाग घेते. पॅनेलिस्टच्या जॉबसाठी तिला पैसे दिले जातात. दीक्षाचे वडील कृष्णा शिंदे हे एका शाळेत प्राचार्य आहेत, तर आई रंजना शिंदे शिकवणी वर्ग घेतात. दीक्षाने असाही दावा केला आहे की, ती ऑक्टोबर 2021 मध्ये होणाऱ्या परिषदेतही सहभागी होईल आणि याचा सर्व खर्च नासा करणार आहे. परंतु आता नव्या खुलाशांमुळे कुशाग्र बुद्धिमत्तेच्या दीक्षाची ऑनलाइन फसवणूक तर होत नाहीये ना, अशी शंका येत आहे. हे वृ़त्त देणाऱ्या एएनआयच्या स्मिता प्रकाश म्हणाल्या की, दीक्षाच्या प्रमाणपत्रांबाबत आणि त्याच्या सत्यतेबाबत ते अधिक माहिती घेत आहेत.
खगोल भौतिकशास्त्रज्ञ जॅकी फेहर्टी यांचे ट्वीट
काही युजर्सनी खगोल भौतिकशास्त्रज्ञ जॅकी फेहर्टी यांनादेखील टॅग केले. त्यांचे नाव दीक्षा शिंदेने शेअर केलेल्या प्रमाणपत्रांपैकी एकावर होते. ट्वीटला उत्तर देताना फेहर्टी म्हणाल्या की, “माझे नाव यात का जोडले गेले हे मला माहिती नाही, परंतु कोणीतरी भारतातील 14 वर्षांच्या मुलीची आणि तिच्या शास्त्रज्ञ होण्याच्या स्वप्नाची फसवणूक करत आहे. जर दीक्षाला खगोलशास्त्राची खरोखर आवड असेल तर ती माझ्यापर्यंत पोहोचू शकते. मी तिच्या या पॅशनसाठी काही वैध मार्ग निश्चितच शोधेन.”
Diksha Shinde a 14-yr-old girl in Aurangabad selected as a panellist on NASA’s MSI Fellowships Virtual Panel
महत्त्वाच्या बातम्या
- धक्कादायक : कोरोनामुळे शूटिंग बंद, मग सुरू झाले सेक्स रॅकेट; पोलिसांनी अटक केल्यावर टॉप मॉडेलने सांगितले हादरवून टाकणारे वास्तव
- ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राच्या नावाने ओळखले जाणार पुण्यातील स्टेडियम! संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांकडून लवकरच घोषणा
- Afghanistan : हवाई दलाच्या C-130J विमानाचे 85 हून अधिक भारतीयांसह उड्डाण, C-17देखील 250 नागरिक आणण्याच्या तयारीत
- विज्ञानाचे डेस्टीनेशन : मणिपूरच्या एका शेतक-याने केली कमाल, तांदळाच्या चक्क 165 प्रजातींचा लावला शोध
- जो बायडेन यांचा पुनरुच्चार, सैनिकांवर हल्ला झाला तर देणार चोख प्रत्युत्तर, आतापर्यंत १३ हजार जणांची सुटका