विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने एसटीचा प्रवास अधिक सुलभ पारदर्शक आणि डिजिटल पद्धतीने करता यावा यासाठी ‘RuPay On-The-Go’ एनसीएमसी सक्षम स्मार्ट कार्ड योजना सुरू केली असून या योजनेच्या कार्डाचे लोकार्पण आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सोबत केले.Digital benefits of ST bus travel for passengers through NCMC Smart Card!!
यावेळी ज्येष्ठ नागरिक श्री रमेश ढावरे आणि सवलतधारक महिला संगीता पालकर आणि वर्षा कांबळे यांना एनसीएमसी स्मार्ट कार्डचे वितरण करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला तसेच विविध सवलतधारक प्रवाशांना आधार क्रमांकाशी संलग्न NCMC स्मार्ट कार्ड वितरित करण्यात येणार आहे. या कार्डच्या माध्यमातून प्रवाशांना एसटी बस प्रवासाचा लाभ डिजिटल पद्धतीने घेता येणार आहे.
परिवहन महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील सर्व आगार आणि स्थानकांवर नोंदणी तसेच वितरण प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याशिवाय सुमारे ३ हजार अधिकृत केंद्रांवर नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री छगन भुजबळ, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल उपस्थित होते.
Digital benefits of ST bus travel for passengers through NCMC Smart Card!!
महत्वाच्या बातम्या
- शिवछत्रपतींनी उभारलेले किल्ले संस्कृतीचे चैतन्यमय तीर्थाटन; खासदार डॉ. सुधांशु त्रिवेदींचे प्रतिपादन
- Raghav Chadha : आप ने राघव-चड्ढा यांना राज्यसभेतून उपनेता पदावरून हटवले; चार वर्षांपासून खासदार
- Amit Shah : शहा म्हणाले- 15 दिवस बंगालमध्ये राहणार; ममतांना त्यांच्याच घरात हरवायचे आहे, TMCला खाडीत फेका
- विधानसभेच्या पोटनिवडणुकीत बारामती मध्ये काँग्रेसला राजकीय पुनरुज्जीवनाची संधी!!