प्रतिनिधी
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीतील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आज रामनवमीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेरीस हजेरी लावली, पण अर्थातच व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे…!! प्रत्यक्षात ते कोल्हापूरला आले नाहीत.Devendra Fadnavis’s two-day campaign tour of Kolhapur; Uddhav Thackeray’s video conference campaign meeting
या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र भाजप उमेदवार सत्यजित उर्फ नाना कदम प्रचारासाठी दोन दिवसांचा कोल्हापूर दौरा केला. काल त्यांनी मोठ्या जाहीर सभेला संबोधित केले तसेच आज अंबाबाई दर्शन आणि श्रीराम दर्शन घेऊन पत्रकार परिषदेला देखील संबोधित केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे भाग घेतला. आम्ही हिंदुत्व विसरलो नाही. विसरणार नाही. पण विरोधकांचा खोटं बोलण्याचा एकमेव कार्यक्रम आहे. त्यामुळे ते शिवसेनेवर हिंदुत्व विसरल्याचा आरोप करत आहेत, असे शरसंधान उद्धव ठाकरे यांनी साधले.
याआधी देवेंद्र फडणवीस यांनी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख शिवसेना नेत्यांनी उर्दू कॅलेंडर छापून जनाब बाळासाहेब ठाकरे असा केल्याची आठवण करून दिली होती. बाळासाहेबांचा उल्लेख “जनाब” असा करून आणि अजान स्पर्धा भरवून शिवसेना छद्म धर्मनिरपेक्ष झाली, असे टीकास्त्र सोडले होते.
देवेंद्र फडणवीसांच्या या टीकेला उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेना हिंदुत्व विसरली नाही. विसरणार नाही पण मर्यादा पाळून नक्की काम करेल. शिवसेनेला भाजपच्या नेत्यांनी हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही, अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या नेत्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
Devendra Fadnavis’s two-day campaign tour of Kolhapur; Uddhav Thackeray’s video conference campaign meeting
महत्त्वाच्या बातम्या
- आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या सहलीसाठी तीन व्यापाऱ्यांनी मोजले चक्क ४.१७ अब्ज रुपये
- राम नवमी – चैत्री नवरात्री निमित्त योगी आदित्यनाथांचे गोरखपुर मध्ये कन्या पूजन!!
- बक्षिसाची रक्कम मिळाली नसल्याची महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलची खंत; भाजपा करणार 5 लाख रुपये देऊन सत्कार!!
- ‘जय श्रीराम’ लिहिल्याने भोपाळमध्ये मुस्लीम व्यक्तीला मुस्लिम धर्मांधांकडून मारहाण : भाजप आमदाराच्या फेसबुक पोस्टवर व्यक्त केली होती प्रतिक्रिया