विशेष प्रतिनिधी
वाशिम : महायुतीचे सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सत्तेवर आलो की, शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देऊ, असे नवे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
कारंजा – मानोरा विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ ९ नोव्हेंबर रोजी स्थानिक विद्याभारती कॉलेजसमोरील विदर्भ कॅन्सर रिलीफ सेंटर येथे आयोजित जाहीर सभेत ते म्हणाले की, कर्जमाफीशिवाय बळीराजाच्या मदतीसाठी महायुती सरकार अनेक उपाययोजना करत आहेत.
आम्ही शेतकऱ्यांच्या कृषिपंपाला दिवसा मोफत वीज देऊ. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची रक्कम १५ हजार करू, तर लाडक्या बहीण योजनेची रक्कम १५०० वरून २१०० रुपयावर नेऊ. याव्यतिरिक्त किमान हमीपेक्षा भाव कमी झाल्यास भावांतर योजना राबवून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा करण्यात येतील.
वाशिम जिल्हा एकेकाळी दुर्लक्षित होता. समृद्धी महामार्गामुळे या जिल्ह्याचा विकास होत आहे असे सांगत फडणवीस म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारच्या प्रयत्नाने राज्यात रेल्वे व मजबूत रस्त्याचे जाळे विणण्यात आले आहे. भविष्यात जिल्ह्यात मोठे औद्योगिक विकास केंद्र तयार होणार आहे.
Devendra Fadnavis’s big announcement, once he comes to power, he will waive farmers’ loans
महत्वाच्या बातम्या
- Dimbhe Dam : डिंभे बोगद्याविषयी भूमिका काय? देवदत्त निकम रोहित पवारांच्या ताटाखालचे मांजर, विवेक वळसे पाटील यांचा आरोप
- Jharkhand Maharashtra झारखंड – महाराष्ट्रात काँग्रेसचा महिलांमध्ये भेदभाव; एकीकडे देणार ₹ 2500, दुसरीकडे ₹ 3000!!
- Sudhanshu Trivedi : संयुक्त राष्ट्रात सुधांशू त्रिवेदींनी पाकिस्तानवर केली जोरदार टीका
- Pakistan Railway Station : पाकिस्तान रेल्वे स्थानकात बॉम्बस्फोट, 21 जणांचा मृत्यू; 30 जखमी