• Download App
    Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळ विस्तारात प्रत्येक समाजाची घेतली काळजी

    Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळ विस्तारात प्रत्येक समाजाची घेतली काळजी

    अशी साधली जात-धर्म आणि प्रादेशिक समीकरणे

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा आज महाराष्ट्रात विस्तार होणार आहे. शपथविधी सोहळा नागपुरात होणार आहे. 39 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. फडणवीस मंत्रिमंडळात मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या नावांच्या यादीत प्रत्येक समाजाची जाती-धर्माची काळजी घेण्यात आली होती. आतापर्यंत समोर आलेल्या नावांनुसार भाजपला 20-21 मंत्रीपदे मिळू शकतात, तर शिंदे यांच्या शिवसेनेला 11-12 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 9-10 मंत्रीपदे मिळू शकतात.

    भाजपच्या कोट्यातून 19 मंत्री –
    1. चंद्रशेखर बावनकुळे-ओबीसी 2. गिरीश महाजन- गुर्जर ओबीसी 3. चंद्रकांत पाटील- मराठा 4. जयकुमार रावल-राजपूत 5. पंकजा मुंडे -MLC बीड-वंजारी समाज मराठवाडा 6. पंकज भोयर- विदर्भ-आरवी मतदारसंघ- कुणबी मराठा 7. राधाकृष्ण विखे पाटील- शिर्डी जागा- पश्चिम महाराष्ट्र मराठा 8.मंगल प्रभात- मारवाडी 9.शिवेंद्रराजे भोसले- मराठा 10. मेघना बोर्डीकर- मराठा 11. नितेश राणे- मराठा 12.माधुरी पिसाळ – ओबीसी 13. गणेश नाईक- ओबीसी 14. आशिष शेलार- मराठा 15. संजय सावकारे-SC 16. आकाश फुंडकर-कुणबी मराठा, 17. जयकुमार गोरे- माळी ओबीसी, 18. अतुल सावे- माळी ओबीसी 19. अशोक भुईके-आदिवासी

    शिंदे शिवसेनेचे 10 मंत्री –

    1.संजय सिरसाट – अनुसूचित जाती 2. उदय सामंत- कायस्थ ब्राह्मण 3. शंभूराजे देसाई- मराठा 4. गुलाबराव पाटील – गुर्जर-ओबीसी 5. भरत गोगावले- ओबीसी मराठा कुणबी 6. संजय राठोड – ओबीसी बंजारा 7. आशिष जैस्वाल- ओबीसी बनिया 8.प्रताप सरनाईक – मराठा 9. योगेश कदम- मराठा 10. प्रकाश आबिटकर- मराठा

    अजित पवार राष्ट्रवादीचे 10 मंत्री

    1. छगन भुजबळ- ओबीसी, 2. अदिती तटकरे-कोकण श्रीवर्धन- ओबीसी 3. नरहरी झिरवाळ- आदिवासी समाज 4. बाबासाहेब पाटील- मराठा 5. हसन मुश्रीफ-मुस्लिम 6. दत्ता भरणे – धनगर समाज 7. धनंजय मुंडे – वंजारी ओबीसी 8. अनिल पाटील- मराठा 9. मकरंद पाटील – मराठा 10 . माणिकराव कोकाटे- मराठा

    महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर झाला. 230 जागा जिंकून महायुतीची सत्ता आली. यामध्ये 132 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. शिंदे यांच्या शिवसेनेने 57 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 41 जागा जिंकल्या.

    Devendra Fadnavis took care of every community in cabinet expansion

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस