अकेला देवेंद्र क्या करेगा??, अशी अडीच वर्षांपूर्वी दर्पोक्ती करणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांना आता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस “ऍक्टिव्ह” दिसले. त्यांनी तशा शब्दांमध्ये फडणवीस यांची स्तुती केली. फडणवीस यांनी असेच काम करत राहावे, अशा सदिच्छा व्यक्त केल्या. महाराष्ट्राच्या “राजकीय संस्कृती”ची त्यांनी या निमित्ताने जपणूक केली.
पण अडीच वर्षांपूर्वी अकेला देवेंद्र क्या करेगा??, असा सवाल करणाऱ्या सुप्रिया सुळेंना देवेंद्र फडणवीस अचानक “ऍक्टिव्ह” दिसण्याचे असे नेमके काय कारण घडले की, ज्यामुळे त्यांना फडणवीस यांची स्तुती करावीशी वाटली??, यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांना टोचण्याचा भाग तर होताच, पण त्यापलीकडे जाऊन फडणवीस आता कुणासाठी थांबत नाहीत आणि मुख्यमंत्री झाल्यावर प्रशासनावरची आपली मांड पक्की करण्यामध्ये फारसा वेळ जाऊ देत नाहीत, याची जाणीव सुप्रिया सुळे यांना झाले असावी म्हणूनच त्यांनी अजित पवारांना टोचण्याच्या निमित्ताने का होईना, पण फडणवीस यांची स्तुती करून घेतली.
देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाल्यानंतर अपेक्षित वेगात मंत्रिमंडळाची स्थापना झाली नाही. खाटेवाटपही लवकर झाले नाही. पालकमंत्री पदाच्या नेमणुका तर अजून व्हायच्या आहेत. त्यामुळे फडणवीसांचे मंत्रिमंडळ “स्लो” चालले आहे, अशी भावना जनमानसात तयार व्हायला लागली. काँग्रेस सकट सगळे विरोधी पक्ष फडणवीस सरकारला टोचायला लागले.
विखे पाटील यांनी सांगितले कधी होणार धनंजय मुंडे यांचा राजीनामा
– प्रशासनावर 100% पकड
पण याच दरम्यान स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी मात्र ज्या पद्धतीने प्रशासनाच्या बैठका घेतल्या, त्यानंतर विविध आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या, ते पाहता फडणवीस 2014 ते 2019 या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने सगळे प्रशासन हाकत होते, त्याच पद्धतीने 2024 नंतर ते काम करतील याची जाणीव सगळ्यांना व्हायला लागली. मंत्रिमंडळाची रचना कशीही असो, त्यामधले राजकीय ताणेबाणे – ताणतणाव कसेही पुढे – मागे सरकत राहोत, प्रशासनावर मुख्यमंत्री म्हणून आपलीच पकड राहील, हे फडणवीस यांनी दाखवून दिले. सरकार आणि प्रशासना मधले सगळे “गिअर्स” आपणच टाकू हे फडणवीसंनी सगळ्यांना लक्षात आणून दिले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार फडणवीसांच्या कामाच्या धडाक्याच्या पार्श्वभूमीवर काहीसे “थंड” पडले. त्यातच संतोष देशमुख प्रकरणांमध्ये धनंजय मुंडे + वाल्मीक कराड यांच्याबरोबरच अजित पवारांचे नाव जोडले गेल्याने अजितदादांचा पक्ष थोडा बॅकफूटवर गेल्यासारखे दिसले, पण या सगळ्या राजकारणाचा फडणवीसांवर कुठला परिणाम झालेला दिसला नाही. उलट फडणवीस यांनी संतोष देशमुख प्रकरण सुद्धा कायद्याच्या कसोटीवर 100% उतरेल अशाच पद्धतीने हाताळले. तिथे कुठलेही “पॉलिटिकल कन्सिडरेशन” किंवा “पॉलिटिकल प्रेशर” येऊ दिले नाही. विरोधकांनी त्या मुद्द्यावरून कितीही राजकारण केले, तरी फडणवीस आणि मात्र कायद्याची कसोटी बिलकुल सोडली नाही. ते “कन्सिस्टंटली” काम करत राहिले. त्यामुळेच शरद पवारांसारख्या मातब्बर नेत्याला देखील फडणवीसांविरुद्ध नवा कुठला “डाव” अजून तरी टाकता आलेला नाही.
– “दादागिरी” उतरवली
एरवी काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीचे सरकार असताना उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादांची मंत्रिमंडळामध्ये “दादागिरी” चालायची. त्यांची प्रशासनावरची पकड, अधिकाऱ्यांवरचा वचक काम होणार असेल, तरच होय म्हणेन. होणार नसेल, तर नाही म्हणून तोंडावर सांगेन वगैरे प्रतिमेचा “धाक” काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात असायचा. आता तो सगळा “धाक” आणि “दादागिरी” सुरुवातीला एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात आणि आता देवेंद्र फडणवीस यांचे मंत्रिमंडळात पूर्ण उतरून गेली आहे. अजितदादा “दुसऱ्या क्रमांका”चे उपमुख्यमंत्री आहेत, हे फडणवीस यांनी अधोरेखित करून ठेवले आहे.
त्यामुळे आपल्या चार टर्मच्या खासदारकीच्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर हे सगळे राजकारण जवळून पाहणाऱ्या सुप्रिया सुळेंना फडणवीस “ऍक्टिव्ह” दिसले नसते तरच नवल!! त्यामुळे फडणवीस “ऍक्टिव्ह” आहेतच, पण त्यांचा “ऍक्टिव्हिजम” महाराष्ट्राच्या पूर्ण प्रशासनावर 100 % पकड मिळवण्याचा आहे आणि पवारांच्या राजकारणाच्या आकलना पलीकडे जाऊन महाराष्ट्रातल्या सर्व क्षेत्रांवर ठसा उमटवण्याचा आहे, हे मात्र निश्चित!!
Devendra fadnavis tightens his grip, his activism beyond pawar politics
महत्वाच्या बातम्या
- Amit Shah : काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता. आजही राहणार आहे, असं शाह यांनी ठामपणे सांगितले.
- विखे पाटील यांनी सांगितले कधी होणार धनंजय मुंडे यांचा राजीनामा
- America : अमेरिकेत आणखी एक मोठा हल्ला; न्यूयॉर्कच्या नाईट क्लबमध्ये गोळीबार, 11 जखमी
- Nitish Kumar : लालूंनी नितीश कुमारांना इंडि आघाडीत परतण्याची दिली ऑफर