जाणून घ्या, फडणवीसांनी या पत्रामध्ये नेमकं काय काय म्हटलं आहे?
विशेष प्रतिनिधी
मुंबई : Devendra Fadnavis महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप नेतृत्वातील महायुतीने दणदणीत यश मिळवलं आहे. तर महाविकास आघाडीला मानहानीकारक पराभवास सामोरं जावं लागलं आहे. महायुतीच्या या विजयात भाजपचा सिंहाचा वाटा आहे. खरंतर भाजपने जिंकलेल्या एकूण जागा या सर्वच राजकीय पक्षांच्या तुलनेत अधिक आहेत. भाजप आणि महायुतीच्या यशाबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेला पत्र लिहून विशेष आभार व्यक्त केले आहेत.Devendra Fadnavis
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, प्रिय बंधु-भगिनींनो, सप्रेम नमस्कार, महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या निवडणुकीत महायुतीला मिळालेला महाविजय फक्त भाजपा-महायुतीचा नाही, तर महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या विश्वासाचा आहे. तुम्ही दाखवलेल्या या विश्वासासाठी आणि दिलेल्या प्रेमाबद्दल महाराष्ट्राच्या जनतेपुढे मी नतमस्तक होतो.
मेहनत, एकजूटता, लाडक्या बहिणींचे आशीर्वाद आणि मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वावर महाराष्ट्राच्या तमाम जनतेने दाखविलेला विश्वास या विजयाचे खरे शिल्पकार आहेत. महायुतीतील सर्व घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी, मित्रमंडळी आणि माझा प्रत्येक समर्पित कार्यकर्ता ज्यांनी गेले काही दिवस जिवाचे रान करून वेळ-काळ न पाहता मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, अश्या सर्वांचा मी कायम ऋणी राहीन!
आपणा सर्वांच्या पाठिंब्यामुळेच महायुतीला मिळालेल्या या विजयाने एक नवीन दिशा दिली आहे. हे यश आपल्या महाराष्ट्राला एक प्रगतीशील आणि सर्वसमावेशक भवितव्यासोबत मा. मोदीजींच्या नेतृत्वात विकसित भारतासह विकसित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रेरणा देत राहील. पुन्हा एकदा आपले मनःपूर्वक आभार. आपला विश्वास आणि प्रेम सदैव राहो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपलाच, देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis thanked the people in a special letter for the success of the Mahayuti
महत्वाच्या बातम्या
- Gautam Adani : गौतम अदानी यांचे लाच प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचले; याचिकेत सेबीच्या विश्वासार्हतेबद्दल चिंता
- Modi – Shah – RSS एकजुटीच्या निर्णयाचा महायुतीच्या नेत्यांचा निर्वाळा; पण शिंदे + अजितदादांच्या हट्ट किंवा आग्रहाची मोदी – शाहांपुढे चालेल
- India : भारताने 300 अब्ज डॉलरचे क्लायमेट पॅकेज नाकारले; COP29 मध्ये म्हटले- एवढ्याने विकसनशील देशांच्या गरजा पूर्ण होणार नाहीत
- Ajit Pawar अजितदादांची चालबाजी, पवार कुटुंबीयांच्या “गेम”वर राम शिंदे यांचा प्रहार; महायुतीच्या नेत्यांना गंभीर दखल घेण्याचा दिला इशारा!!