विशेष प्रतिनिधी
मुंबई : कसिनो मधला फोटो आणि दारूच्या ग्लासचा फोटो यावरून दोन हिंदुत्ववादी पक्षांचे नेते एकमेकांना भिडले आहेत. Devendra fadnavis targets Sanjay raut over morffed photograph of Chandrashekhar bawankule in Macau restaurant
संजय राऊत यांनी एका कसिनोचा फोटो ट्विट केला. फोटोतील कॅसिनो हे चीनच्या मकाऊ येथील असल्याचा दावा संजय राऊतांनी केला. संजय राऊतांनी फोटोतील व्यक्तीचं नाव घेतले नाही. पण फोटोतील व्यक्ती एक हिंदुत्ववादी नेता आहे, असं त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर या फोटोतील व्यक्ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या.
त्यावर भाजपने अधिकृत ट्विटर अकाउंटवर स्पष्टीकरण दिले. आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधी जुगार खेळलेले नाहीत!!
मात्र त्याचवेळी भाजपने आदित्य ठाकरेंचा हातात दारूचा ग्लास असलेला फोटो ट्विट करून त्यातली व्हिस्की कोणत्या ब्रँडची?? असा असा सवाल केला.
स्वतः बावनकुळे यांनीही स्पष्टीकरण दिले. आपण मकाऊच्या हॉटेलमध्ये कुटुंबासह थांबलो होतो. तिथे रेस्टॉरंट आणि कसिनो एकच आहे तिथला हा फोटो आहे, असे बावनकुळे म्हणाले.
मात्र या वादात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना परखड शब्दांत सुनावले.
संजय राऊत यांची विकृत मानसिकता त्यातून झलकते आहे. ते किती डेस्परेट झालेत, हे त्यातून लक्षात येतेय. चंद्रशेखर बावनकुळे पूर्ण परिवारासह त्या हॉटेलमध्ये थांबले होते. बावनकुळे यांनी जिथे जेवले, तिथे रेस्टॉरंट आणि बाजूला कसिनो आहे. जाणीवपूर्वक अर्धवट फोटो ट्विट केला आहे. पूर्ण फोटो ट्विट केला त्यात स्पष्टपणे लक्षात येतेय, बावनकुळे आहेत, त्यांच्या पत्नी आहेत, त्यांची मुलगी, नातू, त्यांचा परिवार आहे, सर्वजण त्यामध्ये दिसत आहेत. ही विकृत मानसिकता संपवली पाहिजे, बंद केली पाहिजे. इतकं फ्रस्टेशन योग्य नाही.
यापेक्षा आणखी काय वाईट परिस्थिती असू शकते? तुम्ही मॉर्फ केलेले फोटो, कापून दिलेले फोटो, असे फोटो टाकून तुम्ही इतके वाईट आरोप करता, म्हणजे ही राजकारणाची पातळी खाली जाण्यासारखंच आहे.
बावनकुळेंचे स्पष्टीकरण
मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो, तेथील हा परिसर आहे. या हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कसिनो एकच आहे. जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो आहे, असे स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलंय.
पण त्यांच्या या स्पष्टीकरणवरही संजय राऊतांनी टीका केली. आपल्याकडे 27 फोटो आणि 5 व्हिडीओ असल्याचा दावा संजय राऊतांनी केला.
Devendra fadnavis targets Sanjay raut over morffed photograph of Chandrashekhar bawankule in Macau restaurant.
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची??,पवारांची की अजितदादांची??; आज सोमवारपासून नियमित सुनावणी!!
- रोहितच्या डोळ्यात अश्रू, भारतभर सन्नाटा; पंतप्रधान मोदींचे मनोधैर्य उंचावणारे ट्विट!!
- भारताच्या किरकोळ आव्हानाच्या सामन्यात डोके शांत ठेवून “हेड” लढला; ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कप घेऊन गेला!!
- उत्तरकाशीमधील बोगद्यात ८ दिवसांपासून अडकून आहेत ४१ मजूर, गडकरी-धामींनी घेतला आढावा, म्हणाले…