विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आत्तापर्यंत काँग्रेसी पंतप्रधान मुख्यमंत्र्यांनी, मंत्र्यांनी रमजानच्या मोठमोठ्या इफ्तार पार्ट्या दिल्या. त्याला सरन्यायाधीश मुख्य न्यायाधीश बाकीचे महत्त्वाच्या, अतिमहत्त्वाच्या व्यक्ती जमल्या. त्यावेळी कोणी गहजब केला नाही. तेव्हा “धर्मनिरपेक्षतेला” “धक्का” पोहोचला नाही, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी काल सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी गौरी गणपतीच्या दर्शनाला गेले. त्यांनी तिथे आरती केली. त्याबरोबर मात्र देशातल्या “धर्मनिरपेक्षतेला” मोठा “धक्का” बसल्याचा “साक्षात्कार” डाव्या इकोसिस्टीमला झाला. डाव्या इकोसिस्टीमने आणि उबाठा शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी पंतप्रधान मोदी आणि सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यावर शरसंधान साधले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी यावरुन सडकून टीका केली. तसेच राज्यातील आमदार अपात्रतेच्या प्रकरणावरुनही संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर निशाणा साधला.
मात्र या सगळ्या टीकेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकेपणाने बोट ठेवून काँग्रेसी पंतप्रधानांच्या इफ्तार पार्ट्यांचे वाभाडे काढले.
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
गणेशोत्सवाची देशभरात सर्वत्र धूम आहे. आस्थेने गणरायाचे पूजन केले जात आहे. काल तर गौरी-गणपतीतील महालक्ष्मीपूजन सुद्धा होते. देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्याकडे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणरायाची आरती केली आणि महालक्ष्मीचे पूजन सुद्धा केले. सरन्यायाधीश महाराष्ट्रातील आहेत. दिल्लीत खास महाराष्ट्रीयन व्यक्तीकडूनच ते दरवर्षी गणरायाची मूर्ती पूजेसाठी आणतात. पण अचानक इकोसिस्टीम अशी कार्यान्वित झाली की, जणू आभाळ कोसळले. फरक फक्त इतकाच आहे की, आधीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे आणि त्याला सरन्यायाधीश उपस्थित रहायचे. पण, गणपती आणि महालक्ष्मी पूजनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले तर इतका गहजब का??, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.
हिंदूत्त्वाला विरोध करता-करता आता गणपती आणि गौरी-महालक्ष्मींना विरोध करण्यापर्यंत का मजल जावी? प्रश्न गहन आहे. विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि सरन्यायाधीशांवर टीका करत महाराष्ट्रीय सणांचा अपमान केला आहे, असे शरसंधान फडणवीसांनी साधले.
Devendra fadnavis targets opposition over Modi – chandrachud ganpati darshan
महत्वाच्या बातम्या
- Jayant Patil : अजितदादांना त्यांच्याच राष्ट्रवादीचे बारामतीतून “परस्पर” तिकीट; जयंत पाटलांची “करामत”!!
- Sitaram Yechury : CPI(M) सरचिटणीस सीताराम येचुरी यांची प्रकृती चिंताजनक!
- Naib Saini : हरियाणात मुख्यमंत्री नायब सैनी यांनी लाडवा येथून दाखल केला उमेदवारी अर्ज
- Hardeep Singh Puri : शीखांबाबतच्या वक्तव्यावरून भाजप राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करणार!