मूठभर धन दांडग्या लोकांचं हे सरकार आहे. मालदार, शेठ, सावकार लोकांचं हे सरकार आहे, अशी टीका त्यांनी केलीय.Devendra Fadnavis slammed Mahavikas Aghadi, said- ‘Even if the wife is killed, the Center will say that she was killed’, this is a government of people who watch money throwing spectacles
विशेष प्रतिनिधी
नांदेड : देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार सुभाष साबणे यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत. यावेळी प्रचारसभेत फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय.
सामान्य माणसाची परिस्थिती खूप वाईट आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय पण या सरकारने एक रुपयांची मदत केली नाही. बोलायला बांधावर जातात, मोठ्या घोषणा करतात. पण यांचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नाहीत. पीक विम्याचे पैसेही शेतकऱ्यांना मिळत नाहीत. हे सरकार इतके लबाड आहेत की काहीही झालं की केंद्रावर ढकलतात. बायकोनं मारलं तरी केंद्रानं मारलं असं सांगतील, अशी खोचक टीका फडणवीसांनी केलीय.
या निवडणूक मुळे इथल्या मतदारांना एक संधी मिळालीय.राज्य सरकारच्या कामावर नापसंती व्यक्त करण्याची ही संधी मिळतेय.प्रधानमंत्री आवास योजनेतून दहा लाख लोकांना घरं दिली. गॅस सिलिंडर मिळालं पाहिजे. पण या सरकारनं गरीबाला एकही घर दिलं नाही. फक्त छपाई आणि पैसे कमावण्याचा उद्योग सुरु आहे. आयकर खात्याच्या घाडीत हजारो कोटी सापडले आहेत. ते जमा करताना सगळा हिशेबही ठेवलाय, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.
एकदा पोटनिवडणूक होऊ द्या, मग इथेही वीज कट करायला येतील
आमच्या काळात पाच वर्षात एकाही शेतकऱ्याचं वीज कनेक्शन कापलं नाही. एकाही शेतकऱ्याची त्याबाबत तक्रार नाही. मात्र, या सरकारमध्ये सर्रास वीज कापली जात आहे. नांदेडमध्येही हे फक्त पोटनिवडणुकीसाठी थांबले आहेत. एकदा पोटनिवडणूक होऊ द्या, मग इथेही वीज कट करायला येतील, असंही फडणवीस म्हणाले. कोरोना काळात केंद्र सरकारनं मोठी मदत केली. पण राज्य सरकारनं एका नव्या पैशाची मदत केली नाही. मूठभर धन दांडग्या लोकांचं हे सरकार आहे. मालदार, शेठ, सावकार लोकांचं हे सरकार आहे, अशी टीका त्यांनी केलीय.
‘पैसा फेक तमाशा देख’वाल्या लोकांचं सरकार
लोकशाहीत मतदानाच्या माध्यमातून आपला राज व्यक्त करता येतो. या सरकारनं एकएका समाजाची अवस्छा काय केली आहे. ओबीसींचं आरक्षण काढलं. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात मराठा समाजाचं आरक्षण गेलं. हे केवळ ‘पैसा फेक तमाशा देख’वाल्या लोकांचं सरकार आहे. सुभाष साबणे यांनी 15 वर्षे माझ्यासोबत काम केलं आहे. ते धडाडीने काम करणारे नेते आहेत. राजकारणात गैरसमज होत असतात. दरी निर्माण होत असते. पण साबणे हे स्वतंत्र काम करणारा माणूस आहे.
धनशक्ती विरोधात जनशक्ती अशी ही लढाई
पैशाच्या जीवावर निवडणूक जिंकता आली असती तर अशोकराव लोकसभेला तुम्ही हरलेच नसते. लोकांची डोकी फिरली की शॉक द्यावा लागतो. तसा शॉक या निवडणुकीत या लोकांना द्या, असं आवाहन फडणवीसांनी मतदारांना केलंय.
Devendra Fadnavis slammed Mahavikas Aghadi, said- ‘Even if the wife is killed, the Center will say that she was killed’, this is a government of people who watch money throwing spectacles
महत्त्वाच्या बातम्या
- नबाब मलिक यांनी काढली समीर वानखेडे यांची जात, जात प्रमाणपत्र शेअर करत म्हणाले यहाँसे शुरु हुआ फर्जीवाडा’
- India T20 WC Final: टीम इंडियाला आता चारही सामने जिंकावे लागतील, उपांत्य फेरीत इंग्लंड विरुद्ध होऊ शकतो सामना
- फारूख अब्दुल्ला मला पाकिस्तानशी बोलण्याचा सल्ला देतात, पण मी काश्मीरी युवकांशी मैत्रीसंवाद साधणार; अमित शहांचा टोला
- बांगलादेशात हिंदूंवर हल्ले; केंद्र सरकारची त्यावर अधिकृत प्रतिक्रिया नाही; बांगलादेशी नौदल प्रमुखांचे दिल्लीत स्वागत