नाशिक : मंत्रिमंडळातल्या चार चुकार मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झापले की नाही??, याच्यावर मराठी माध्यमांनी बराच खल केला. विरोधी पक्षांनी टीका टिप्पण्या केल्या पण स्वतः फडणवीसांनी मात्र मंत्रिमंडळात जे बोललो, ते बाहेर सांगणार नाही, तेवढे एकच वाक्य बोलून ते बरेच काही between the lines सांगून गेले!! Devendra Fadnavis
फडणवीसांच्या तिसऱ्या कार्यकाळातल्या चार मंत्र्यांनी वाटेल तसे बोलून आणि चुकीच्या राजकीय कृती करून फडणवीस सरकारची बदनामी केली. त्यामध्ये शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे मंत्री जास्त राहिले. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी तर चुकांची परिसीमा गाठली तरी देखील सगळ्या मंत्र्यांना वाचविण्याची भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली. शिवसेनेच्या मंत्र्यांवर कारवाई झाली, तरच आमच्या मंत्र्यांवर कारवाई करणार असे ते बोलल्याचे माध्यमांमधून समोर आले.
– फडणवीसांचा रुद्रावतार
या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या नियमित बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व सचिवांना बाहेर जायला सांगितले आणि त्यानंतर फक्त मंत्र्यांना बैठकीत बसवून ठेवले. त्यावेळी त्यांनी 20 मिनिटे सगळ्या मंत्र्यांना झापले. तुमच्यामुळे सरकारची प्रतिमा मलिन होत असेल, तर तुम्हाला कुणालाही सोडणार . कुणाचेही खुलासे ऐकूनही घेणार नाही. आत्ता दिलीय ती संधी शेवटची आहे, हे लक्षात ठेवा, असे स्पष्ट बजावले. त्यामुळे फडणवीसांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत रुद्रावतार धारण केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री गप्प बसून राहिले होते.
– फडणवीसांचे एकच वाक्य
या पार्श्वभूमीवर अण्णा डांगे यांच्या भाजप प्रवेशाच्या वेळी मुंबईत पत्रकारांनी फडणवीसांना कालच्या झापाझपी बद्दल प्रश्न विचारला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी फक्त एका वाक्यात उत्तर दिले. मंत्रिमंडळात जे बोललो, ते बाहेर सांगायचे नसते, एवढेच सांगून ते निघून गेले. पण या एका वाक्यामध्येच फडणवीस बरेच काही between the lines बोलून गेले. मंत्र्यांच्या चुकारपणामुळे सरकारची बदनामी झाली ही बाब फडणवीस यांनी अत्यंत गांभीर्याने घेतली. त्यांनी प्रत्येक मंत्र्याला वर्तणुकीत सुधारणा करायला सांगितले अन्यथा कुणाचाही मुलाहिजा न बाळगता मंत्री पदावरून बाजूला करावे लागेल, असेही अप्रत्यक्षपणे सूचित केले.
– दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बदलाची जाणीव
त्यातून फडणवीसांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आता काळ बदललाय, आपण मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत बसलोय याची “गंभीर” जाणीव करून दिली. त्यामुळे अजितदादांची विशेषत्वाने गोची झाली. सरकार कुणाचेही असले तरी उपमुख्यमंत्री आपणच असतो हा दर्प अजितदादांनी बाळगला, पण इतरांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदावर राहून “दादागिरी” करायची, तसली “दादागिरी” फडणवीस सरकारमध्ये चालणार नाही हे मुख्यमंत्र्यांनी कालच्या बैठकीत दाखवून दिले. माणिकराव कोकाटे यांना आत्ता वाचविले असले, तरी प्रत्येक वेळी तसे घडेलच, याची कुठलीही गॅरंटी कुणालाही त्यांनी दिली नाही.
Devendra Fadnavis said, “What I said in the cabinet, I will not say outside!!
महत्वाच्या बातम्या
- पीएम मोदींचे संसदेतील संपूर्ण भाषण; काँग्रेसला दाखवला आरसा, म्हणाले- इतकी चर्चा करा की शत्रू घाबरेल!
- जगातल्या कुठल्याही नेत्याने Operation Sindoor थांबवायला सांगितले नाही; डोनाल्ड ट्रम्पच्या 25 दाव्यांना मोदींचा एकच फटका
- Bihar SIR : बिहारमध्ये SIR वर तूर्त बंदी नाही; SCने ECला विचारले- आधार कार्ड व मतदार ओळखपत्र का समाविष्ट करत नाही?
- Shashi Tharoor : ऑपरेशन सिंदूरवर चर्चा, थरूर म्हणाले – मौन व्रत; संसदेत काँग्रेसच्या विचारसरणीवर बोलण्यास नकार दिल्याची चर्चा