लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपची कामगिरी यावेळी अपेक्षेपेक्षा खूपच कमी होती
विशेष प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा निवडणूक-2024 चा निकाल समोर आला असून आता त्याचा आढावा सुरू आहे. लोकसभेच्या ४८ जागा असलेल्या महाराष्ट्रात भाजपची कामगिरी यावेळी अपेक्षेपेक्षा खूपच कमी होती. पक्षाच्या खराब कामगिरीची जबाबदारी घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद सोडण्याची तयारी दर्शवली होती.Devendra Fadnavis said I will not be disappointed
फडणवीस यांनी शुक्रवारी सायंकाळी उशीरा अमित शाह यांचीही भेट घेतली. शनिवारी फडणवीस म्हणाले की, यशाचे अनेक बाप असतात, तर अपयशाचा एकच असतो. ते म्हणाले की, जेव्हा त्यांनी पद सोडून पक्षासाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली, ते वेगळ्या प्रकारे घेतलं गेलं. महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी मी घेतली होती, पण मी निराश होणार नाही.
देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात शनिवारी बैठक झाली. पुन्हा तयारी सुरू करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळाले नाही, त्याची कारणे शोधून ती दूर करण्याची गरज आहे. यशाला अनेक बाप असतात, पण अपयशाला एकच असतो. महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी मी घेतली होती. मला सरकारमधून मुक्त करून पक्षासाठी काम करण्याची संधी द्यावी, असे मी सांगितले. देवेंद्र हा निराश होणारा माणूस नाही…ज्यांना वाटत असेल मी निराश झालो, ते बरोबर नाही, असे महाराष्ट्राचे फडणवीस म्हणाले. तसेच, ‘मी अमित शाहांना भेटलो आणि माझ्या मनात काय आहे ते सांगितले. अमित शाह म्हणाले की, सध्या जे काही काम सुरू आहे, ते चालू द्या. नंतर बघू.’
Devendra Fadnavis said I will not be disappointed
महत्वाच्या बातम्या
- नितीश कुमार यांचा निर्धार, मी कायम मोदींसोबत असेन, भाषणानंतर पंतप्रधानांचे चरण स्पर्श करू लागले तेव्हा मोदींनी हात धरला
- पुण्यात आजपासून “सक्षम” संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन; शोभायात्रा आणि प्रदर्शन घेतील लक्ष वेधून!!
- फरिदाबादमध्ये रेल्वेचे दोन डबे रुळावरून घसरले, बचावकार्य सुरू
- मोदींच्या हॅटट्रिक शपथविधीचा मुहूर्त ठरला; स्थळ : राष्ट्रपती भवन, 9 जून 2024 सायंकाळी 7:15!!