• Download App
    Devendra fadnavis rubbed salt on NCP's political wound सुप्रिया सुळेंनी ओपन चॅलेंज स्वीकारताच, फडणवीसांनी "हे" सांगून डिवचले!!

    सुप्रिया सुळेंनी ओपन चॅलेंज स्वीकारताच, फडणवीसांनी “हे” सांगून डिवचले!!

    Devendra Fadnavis

    नाशिक : लोकसभेत महिला आरक्षण आणि पुनर्रचना विधेयके विरोधकांनी फेटाळल्यानंतर भाजपने देशभरात निदर्शने केली भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी आपापल्या राजधान्यांमध्ये पत्रकार परिषदा घेऊन काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर सडकून टीका केली.Devendra fadnavis rubbed salt on NCP’s political wound

    या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये महायुतीच्या महिला नेत्यांना एकत्र आणून एक पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या बरोबरीच्या कुठल्याही नेत्यांबरोबर महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर जाहीरपणे चर्चा करायचे ओपन चॅलेंज दिले. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेनंतर सुप्रिया सुळे यांनी छोटेखानी पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांचे ओपन चॅलेंज स्वीकारले.



    – फडणवीसांचे चपखल उत्तर

    मात्र, त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी चपखल उत्तर देऊन सुप्रिया सुळे आणि अख्ख्या पवार परिवाराला डिवचले. देवेंद्र फडणवीस मुंबईतून शिर्डीत पोहोचल्यानंतर त्यांना पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांनी तुमचे ओपन चॅलेंज स्वीकारल्याचे सांगितले. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांबरोबर महिला आरक्षणावर खुली चर्चा करायचे माझे आजही ओपन चॅलेंज आहे, असे सांगितले आणि ते निघून गेले.

    – फडणवीसांच्या वक्तव्यातला झटका

    देवेंद्र फडणवीस यांच्या या एकाच वाक्यात मोठा राजकीय “झटका” होता. त्यांनी काँग्रेसच्या किंवा राष्ट्रवादीच्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करायला ओपन चॅलेंज देऊन टाकले. पण संपूर्ण देशात काँग्रेसचे तीन-चार तरी मुख्यमंत्री आहेत. पण राष्ट्रवादीचा एकही मुख्यमंत्री नाही. सुप्रिया सुळे ज्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधित्व करतात, त्या राष्ट्रवादीला कधीच महाराष्ट्रात मुख्यमंत्री करता आला नाही. राष्ट्रवादी अखंड असताना किंवा फुटल्यानंतर सुद्धा राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद कधी मिळवता आले नाही.

    – राष्ट्रवादीचे नेते पोस्टर वरचे मुख्यमंत्री

    अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रोहित पवार यांच्या समर्थकांनी नेहमीच त्यांची नावे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टरवर लिहिली. पण शरद पवारांच्या राजकीय कर्तृत्व अभावी त्यांना कधीच मुख्यमंत्रीपद मिळू शकले नाही.

    – फडणवीसांनी राजकीय जखमेवर चोळले मीठ

    देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीमध्ये केलेल्या एका छोट्याशा वक्तव्यातून राष्ट्रवादीला सतत टोचत राहणारीच भावना डिवचली. सुप्रिया सुळे यांच्यासारख्या नेत्यांनी माझे ओपन चॅलेंज स्वीकारून उपयोग नाही. कारण त्या माझ्या बरोबरीच्या नाहीत, असेच देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्षात तसे न बोलता सांगून टाकले. राष्ट्रवादीच्या राजकीय जखमेवर मीठ चोळले.

    Devendra fadnavis rubbed salt on NCP’s political wound

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    TCS कॉर्पोरेट जिहादचा तपास समाधानकारक; राष्ट्रीय महिला आयोगाच्या तथ्य शोध पथकाचा रिपोर्ट आल्यावर पुढची कारवाई; विजयाताई रहाटकरांची ग्वाही

    माध्यमांनी महिलांविषयी संवेदनशील, जबाबदार आणि अचूक वार्तांकन करावे, राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर यांचे आवाहन

    TCS कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात फरार निदा खानाला दिलासा द्यायला नाशिक कोर्टाचा नकार; अटकपूर्व जामिनाच्या विषयावर 27 एप्रिलला सुनावणी