जाणून घ्या, नेमका चाणक्यांच्या कोणत्या वाक्याचा संदर्भ फडणवीसांनी दिला आहे.
विशेष प्रतिनिधी
नागपूर : ठाण्यात ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना कथितरित्या शिंदे गटाच्या काही महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासमवेत ठाण्यात रुग्णालयात जाऊन संबंधित महिलेची विचारपूस केली आणि त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांबद्दल वापरलेल्या शब्दामुळे राजकीय वातावरण प्रचंड तापल आहे. तर, खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. Devendra Fadnavis Reply to Uddhav Thackeray Criticism Referring to Arya Chanakya Quote
नागपूरात प्रसारमाध्यमांशी या पार्श्वभूमीवर बोलताना फडणवीस म्हणाले, ‘’एखादी घटना घडली तर त्याची निपक्ष चौकशी निश्चितपणे आमचं सरकार करेल. पण त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न कोणी करू नये. राजकारण करण्याचा प्रयत्न केला, तर ते योग्य देखील होणार नाही. त्यामुळे त्यासंदर्भातही उचित चौकशी होईल. जे घडलं असेल, कोणी चूक केली असेल त्याच्यावर कारवाई होईल, केली जाईल.’’
‘’ज्यादिवशी बोलणं सुरू करेन त्या दिवशी…’’ – देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना थेट इशारा!
याचबरोबर, ‘’चाणक्य एकदा असं म्हणाले होते, की ज्यावेळी राज्यातील चोर, डाकू, लुटेरी किंवा अपप्रवृत्तीचे लोक हे राजाच्या विरुद्ध बोलतात, त्यावेळी समजायचं राजाने योग्य काम सुरू केलेलं आहे. मी राजा नाही पण तरी देखील तुमच्या हे लक्षात येत असेल, चाणक्य जे म्हणाले तेच आता खरं होतंय.’’ असं म्हणत फडणवीसांनी टोलाही लगावला.
त्यापेक्षा खालच्या पातळीची भाषा मला येते, परंतु … –
‘’उद्धव ठाकरेंनी ज्या भाषेचा वापर केला आहे, त्यापेक्षा खालच्या पातळीची भाषा मला येते. परंतु मी त्या भाषेचा वापर करणार नाही. उद्धव ठाकरे नैराश्यात आहेत. अडीच वर्षे ते मुख्यमंत्री राहिले, घराच्या बाहेर नाही निघाले, घरातूनच कामकाज केलं. जनतेत कधी गेले नाहीत, त्यामुळे त्यांच्याबद्दल जनता जाणते. असे एक कमजोर मुख्यमंत्री ज्यांचे दोन-दोन मंत्री तुरुंगात गेल्यानंतरही ते त्यांचा राजीनामा घेऊ शकले नाहीत. कारण, त्यांना खुर्ची जाण्याची भीती होती.‘’ असं फडणवीस यावेळी म्हणाले.
याशिवाय, ‘’वाझेसारख्या ब्लॅकमेलरला पोलीस विभागात घेऊन, त्याला वाचवण्याचं काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या रूपात त्यांना, महाराष्ट्र आणि देशाच्या जनतेने पाहीलं आहे. त्यामुळे अशा व्यक्तीला मी काहीच महत्त्व देत नाही. जे सत्तेसाठी विचारांना लाथ मारतात, खुर्चीसाठी विचार सोडतात. अशा व्यक्तीवर मी बोलू हे मला योग्य वाटत नाही.’’ असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं.
Devendra Fadnavis Reply to Uddhav Thackeray Criticism Referring to Arya Chanakya Quote
महत्वाच्या बातम्या
- ‘’…तर राहुल गांधींच्या फोटोला चपला मारण्याचं काम उद्धव ठाकरे तुम्ही आणि तुमच्या सेनेने केलं असतं’’ देवेंद्र फडणवीसांनी लगावला टोला!
- ”सावरकरांनी ११ वर्षे काळ्यापाण्याची शिक्षा भोगली आणि हे हरामखोर…” देवेंद्र फडणवीसांचे काँग्रेसवर टीकास्त्
- COVID -19 करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हरियाणा सरकारने घेतला मोठा निर्णय!
- ”सावरकरांनी ११ वर्षे काळ्यापाण्याची शिक्षा भोगली आणि हे हरामखोर…” देवेंद्र फडणवीसांचे काँग्रेसवर टीकास्त्र!