विशेष प्रतिनिधी
मुंबई : Devendra Fadnavis मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापविणाऱ्या काँग्रेसच्या चुकांची यादी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यादीच वाचली आणि काँग्रेस सकट उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना तुम्ही माफी मागणार कधी??, असा बोचरा सवाल केला. Devendra Fadnavis read the list of mistakes of Congress
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ महिन्यांपूर्वी लोकार्पण केलेला शिव छत्रपतींचा पुतळा कोसळल्यामुळे विरोधकांना राज्य सरकारला ठोकायची संधी मिळाली. पण वाढवण बंदराच्या भूमिपूजनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवप्रेमींची माफी मागितली. पण पंतप्रधान मोदी महाराष्ट्राची माफी मागत असताना मागे बसलेले देवेंद्र फडणवीस हसत होते, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे. यावर आता देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाची, शिवप्रेमींची माफी मागितली, मात्र उद्धव ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला माफी मागायला लावणार का?? कित्येक वेळा काँग्रेसने, त्यांच्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. मात्र, उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांनी त्यांना कधी माफी मागायला सांगितले नाही.
मला उद्धव ठाकरे यांना एक प्रश्न विचारायचा आहे की भारताचे दिवंगत पंतप्रधान पंडित नेहरू यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’मध्ये जे काही लिहिलं आहे, त्याबाबत ते काँग्रेसला माफी मागायला लावणार का??
मध्य प्रदेशमध्ये शिवाजी महाराजांचा एक पुतळा तिथल्या कमलनाथ सरकारने बुलडोझर लावून तोडला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार आणि उद्धव ठाकरे याबाबत मूग गिळून गप्प का बसले आहेत?? कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवला, त्याबद्दल उद्धव ठाकरे किंवा शरद पवार काहीच का बोलत नाहीत??
गेल्या अनेक वर्षांमध्ये काँग्रेसने देशाला चुकीचा इतिहास शिकवला. त्यांनी देशाला शिकवलं की शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. पण शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नव्हती. औरंगजेबाने स्वराज्याचा लुटलेला खजिना शिवाजी महाराजांनी परत मिळवला. काही ठराविक लोकांकडून तो खजिना त्यांनी परत मिळवला जो पुढे स्वराज्यासाठी वापरला. मात्र, आम्हाला चुकीचा इतिहास शिकवला गेला. महाराजांनी सुरतेवर आक्रमण केलं आणि तिथल्या सामान्य माणसांची लूट केली नाही. मात्र महाराज जणू तिथल्या सामान्य लोकांची लूट करायला सुरतेला गेले होते असा चुकीचा इतिहास आम्हाला शिकवला गेला. याबाबत उद्धव ठाकरे किंवा शरद पवार काँग्रेसला माफी मागायला लावणार का??
Devendra Fadnavis read the list of mistakes of Congress
महत्वाच्या बातम्या
- Tejashwi Yadav : सॅम पित्रोदा यांचा आत्मा तेजस्वी यादवमध्ये आहे का? – भाजपचा टोला!
- Haryana assembly elections : हरियाणा विधानसभा निवडणुकीची नवी तारीख जाहीर!
- Giriraj Singh attack : बेगुसराय येथे केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्यावर हल्ला
- Ladki Bahin Yojna In Nagpur : नागपुरात लाडक्या बहिणींच्या कार्यक्रमात कृतज्ञता आणि उत्साहाची अपूर्व जोड!!