प्रतिनिधी
मुंबई : पोस्टर्स वरच्या मुख्यमंत्र्यावर दुहेरी मोदी इफेक्ट झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे फोटो भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्सवर लावणाऱ्या अजितनिष्ठ आमदारांना आणि कार्यकर्तांना दुहेरी चपराक खावी लागली आहे. आधी अजितदादांनी आपल्या समर्थक आमदारांना आणि कार्यकर्त्यांना झापले. नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांना कडक शब्दांत कानपिचक्या दिल्या. Devendra fadnavis punched ajit pawar supporters over chief ministerial posters
भावी मुख्यमंत्री म्हणून अजितदादांची कितीही पोस्टर्स लावली, तरी महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच राहणार आहेत. खुद्द अजितदादांनाही मंत्रिमंडळात घेताना भाजपचे श्रेष्ठींनी हेच स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे समझनेवाले को इशारा काफी है, अशा स्पष्ट शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादा समर्थक आमदारांना आणि कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या.
महाराष्ट्रात महायुती बद्दल गैरसमज तयार होत आहेत. तसे गैरसमज महायुतीतल्या कोणत्याही पक्षातल्या नेत्यांनी पसरवू नयेत. हे भाजप श्रेष्ठींना मान्य होणार नाही. आमदारांनी आणि कार्यकर्त्यांनी तशी वक्तव्ये करू नयेत. महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदल होणार नाही. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील, असेही देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादा समर्थकांना खडसावले.
तत्पूर्वी, अजितदादांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोरच राष्ट्रवादीचे मंत्री अनिल पाटील, धर्मराव बाबा आत्राम आणि आमदार अमोल मिटकरी यांना झापले. मुख्यमंत्री बदला संदर्भात कोणीही वक्तव्य करू नयेत, असा स्पष्ट इशारा अजितदादांनी आपल्या समर्थकांना दिला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी कडक शब्दांत कानपिचक्या दिल्या.
Devendra fadnavis punched ajit pawar supporters over chief ministerial posters
महत्वाच्या बातम्या
- पोर्ट सुदान विमानतळावर प्रवासी विमान कोसळले, चार लष्करी जवानांसह नऊ जणांचा मृत्यू!
- अजितदादांची मुख्यमंत्री पदाची पोस्टर्स; भाजप नेत्यांचा इशारा; त्यानंतर सुनील तटकरेंचा चर्चेवर पडदा!!
- शिंदे – फडणवीसांच्या देखरेखीखाली अजित दादांचे निधी वाटप; पण आता ते ठाकरे गटाच्या टीकेचे धनी!!
- नुसते मोदी – योगींच्या नावांवर अवलंबून राहू नका, संघटना वाढवा; बी. एल. संतोष यांनी घेतला भाजप कार्यकर्त्यांचा क्लास!!