• Download App
    नवाब मलिकांच्या मुद्द्यावर अजितदादांना दणका; महायुतीत भाजपच "खरा दादा"!! Devendra fadnavis proved that BJP is "the boss" in mahayuti over nawab malik issue!!

    नवाब मलिकांच्या मुद्द्यावर अजितदादांना दणका; महायुतीत भाजपच “खरा दादा”!!

    नाशिक : देशद्रोहाचा आरोप असलेले नवाब मलिक महायुतीत नकोत, असे परखड बोल लिहिलेले पत्र अजितदादांना पाठवून महायुतीत भाजपच “खरा दादा” असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सिद्ध केले!! Devendra fadnavis proved that BJP is “the boss” in mahayuti over nawab malik issue!!

    भाजपचे 106 आमदार असताना भाजपचे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री पद नाही. भाजपच्या आमदारांना त्यांच्या संख्याबळाच्या आधारे मंत्रीपदे मिळाली नाहीत. त्या उलट एकनाथ शिंदेंच्या रूपाने मुख्यमंत्रीपद शिवसेनेला दिले. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांचे पूर्ण बहुमत विधानसभेत असताना देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीत स्थान दिले. त्यामुळे भाजप महायुतीतल्या अन्य दोन पक्षांच्या कात्रीत सापडला, असा नॅरेटिव्ह मराठी माध्यमांनी तयार केला होता. तो देवेंद्र फडणवीस यांच्या एका पत्राने पूर्ण उद्ध्वस्त करून टाकला. महायुतीत अजितदादांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसला घेऊन अजित पवारांना उपमुख्यमंत्री करून “नवा दादा” आणला, असे बोलले गेले तरी, प्रत्यक्षात महायुतीमध्ये भाजपच “खरा दादा” असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्राद्वारे सिद्ध केले.

    नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचे आरोप आहेत. ते केवळ वैद्यकीय कारणासाठी जामिनावर बाहेर आहेत. त्यांना विधानसभा सदस्य म्हणून विधानसभेच्या कामकाजात भाग घेण्याचा अधिकार आहे. त्यांच्याविरुद्ध वैयक्तिक शत्रुत्व अथवा आकस नाही, पण ज्या देशद्रोहाचे आरोप त्यांच्याविरुद्ध आहेत, ते पाहता त्यांना महायुतीत सामील करून घेता येणार नाही, असे परखड बोल देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांना लिहिलेल्या पत्रातून ऐकवले आहेत.

    हे एका राजकीय नेत्याने दुसऱ्या राजकीय नेत्याला लिहिलेले नेहमीचे पत्र नाही, तर महाराष्ट्रात कोणत्याही स्थितीत राष्ट्रवादाशी तडजोड करणाऱ्या व्यक्तीशी अथवा नेत्याशी अथवा पक्षाशी भाजप तडजोड करणार नाही, असा स्पष्ट संदेश फडणवीसांनी दिला आहे. नवाब मलिकांना महायुतीत घ्यायचे असेल, तर आपण बाहेर व्हा!!, असे फडणवीस यांनी पत्रात थेट लिहिलेले नाही पण त्या पत्राचा संदेश किंवा “बिटवीन द लाईन” तोच आहे. भाजपची ती राजकीय सोय नाही, तर भाजप आणि शिवसेना मिळून ज्या राष्ट्रवादाच्या राजकारणाचा पुरस्कार ते करतात, त्याला अनुसरून घेतलेली ही परखड भूमिका आहे.

    शिवसेना आणि भाजप हे दोन हिंदुत्ववादी पक्ष आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस आजही धर्मनिरपेक्ष आहे, अशी अजितदादांनी सत्तेत सामील झाल्यानंतर देखील अनेकवार सांगितले होते. पण या “धर्मनिरपेक्षतेत” नवाब मलिकांना बसवू नका, असा स्पष्ट संदेश फडणवीसांनी या एका पत्रातून दिला आहे. फडणवीसांच्या पत्राचे हे राजकीय खरे महत्त्व आहे.

    यातून फडणवीसांनी महाराष्ट्रातली भाजपची पुढची वाटचाल राष्ट्रवादाच्याच राजकारणावर सुरू राहील आणि ती भाजपच्या “टर्म्स अँड कंडिशन्सवर” सुरू राहील, हे देखील अधोरेखित केले आहे. नवाब मलिकांना महायुतीत घ्यायचे का नाही, हे तुम्ही ठरवा किंवा त्यांना मागच्या किंवा पुढच्या दाराने ऍडजेस्ट करा, अशी कुठलीही “सवलत” फडणवीसांनी अजित पवारांना बहाल केलेली नाही. यातूनच महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवारांच्या नाव “दादा” आहे, पण महायुतीत भाजपच “खरा दादा” आहे, हे देवेंद्र फडणवीस यांनी सिद्ध केले आहे!!

    Devendra fadnavis proved that BJP is “the boss” in mahayuti over nawab malik issue!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    NCP and Shiva Sena राष्ट्रवादीने पोस्टर वरती चढवून ठेवले “भावी मुख्यमंत्री”; तशीच ठाकरे बंधूंनी मारली पोस्टर वरती मिठी!!

    Sharad Pawar NCP : पवारांच्या पक्षाची अवस्था चव्हाण + रेड्डी काँग्रेस सारखी; त्यांच्या राष्ट्रवादीच्या गळतीतून अजितदादांच्या राष्ट्रवादीची भरती!!

    Devendra Fadanvis : प्रशासकीय सेवेत महाराष्ट्र राज्य अग्रणी!