नाशिक : देवेंद्र फडणवीस यांच्या गोपीचंद पडळकर यांना कानपिचक्या; पण ते मोठे नेते व्हायचाही दिला दाखला!!, असे आज गोपीचंद पडळकर विरुद्ध जयंत पाटील अशा रंगलेल्या सामन्यात घडले. Devendra fadnavis
त्याचे झाले असे :
गोपीचंद पडळकर यांची जीभ नेहमी घसरते, त्याच पद्धतीने ती जयंत पाटलांवर टीका करताना सुद्धा घसरली. जयंत पाटील हे राजारामबापू पाटील यांचे पुत्र आहेत की नाही, याविषयी शंका आहे. काहीतरी गडबड घोटाळा आहे, असे वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केले. त्यामुळे राष्ट्रवादीचे दुभंगलेले सगळे कुटुंब भडकले. या दुभंगलेल्या कुटुंबाला एकदम यशवंतराव चव्हाण यांच्या “सुसंस्कृत” राजकारणाची आठवण झाली. त्यामुळे शरद पवारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याविषयी त्यांच्याकडे तक्रार केली. आता खुद्द शरद पवारांनीच मुख्यमंत्र्यांना फोन लावल्यानंतर राष्ट्रवादीच्या दुभंगलेल्या कुटुंबातले सगळे सदस्य एकत्र आले आणि त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्याविरुद्ध मोठी आघाडी उघडली. खासदार अमोल कोल्हे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले. नेहमीप्रमाणे आमदार रोहित पवार उपदेशी भाषेत पचकले.
गोपीचंद पडळकर किती “असभ्य” आणि आम्ही किती “सभ्य आणि संस्कारित”, असा आव राष्ट्रवादीच्या दुभंगलेल्या कुटुंबातल्या सगळ्या नेत्यांनी आणला. (पण पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून तृतीय पंथीयासारखे हातवारे केले होते तेव्हा आणि सक्षणा सलगर नरेंद्र मोदींना “वाटाणा” आणि देवेंद्र फडणवीस यांना “फुटाणा” मानली होती तेव्हा, राष्ट्रवादीच्या दुभंगलेल्या कुटुंबातल्या नेत्यांना यशवंतराव चव्हाणांचे “सुसंस्कृत” राजकारण आठवले नव्हते. “ते” “फक्त” पडळकरांनी टीका केल्यानंतर आठवले.)
फडणवीसांची चतुराई
पण देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय चतुराईने राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुभंगलेल्या कुटुंबाच्या आशा आकांक्षांवर पाणी फेरले. त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचे समर्थन केले नाही. उलट पडळकर यांना कानकिचक्याच दिल्या, पण त्याचवेळी फडणवीसांनी गोपीचंद पडळकर यांना भविष्यात मोठे नेते व्हायची संधी असल्याचा दाखलाही दिला. कुणाच्याही वडिलांविषयी किंवा परिवाराविषयी काही चुकीचे बोलू नये. पडळकर आक्रमकता दाखवण्याच्या नादात चुकीचे बोलून जातात. त्याविषयी शरद पवारांचा मला फोन आला होता. मी पडळकर यांच्याशी देखील बोललो. त्यांनी अशा प्रकारची वक्तव्ये करू नयेत. आपण काय बोलतो, त्याचे अर्थ काय निघतात, याचे भान त्यांनी बाळगावे. भविष्यात त्यांना मोठा नेता व्हायची संधी आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या वक्तव्यातून त्यांनी वाद निर्माण करू नये, असा उपदेश फडणवीस यांनी पडळकर यांना उद्देशून केला.
– मिरच्या झोंबल्या
पण याच वक्तव्यातून फडणवीसांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या आशा आकांक्षांवर पाणी फेरले. गोपीचंद पडळकर अधून मधून घसरतात हे खरे, पण ते राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मर्मावर बरोबर आणि अचूक आघात करतात. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते इतर कुठल्याही नेत्यांवर चिडण्यापेक्षा गोपीचंद पडळकर यांच्यावर जास्त भडकतात. राष्ट्रवादीचे सगळे नेते पडळकरांवर खार खातात. कारण आपले सगळे बिंग पडळकर फोडतात, याचा राष्ट्रवादीच्या नेत्यांना प्रचंड राग येतो. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दुभंगलेल्या कुटुंबातले नेते पडळकर यांच्या विरोधात नेहमीच एकत्र येतात. काहीही करून फडणवीस यांनी पडळकर यांना झापावे. त्यांना राजकारणातून बाजूला करावे जेणेकरून पडळकर राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मर्मावर बोट ठेवू शकणार नाहीत. त्यांचे बिंग फोडू शकणार नाहीत, त्यामुळे राष्ट्रवादीचे सगळे नेते आणि पडळकरांवर आणि त्यांच्या निमित्ताने फडणवीसांवर तुटून पडतात. पण फडणवीस आणि मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा हा नेहमीचा डाव आज उधळूनच लावला. त्यांनी पडळकर यांना फक्त कानपिचक्या दिल्या, पण भविष्यातले मोठे नेते व्हायचा दाखलाही दिला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या नाकाला मिरच्या झोंबल्या.
Devendra fadnavis preached gopichand padalkar over his controversial statement
महत्वाच्या बातम्या
- अलंद मतदारसंघातील मतदार वगळल्याचा राहुल गांधी यांचा दावा दाव्यावर निवडणूक आयोगाने फेटाळला
- Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले – पराली जाळणाऱ्यांना अटक का नाही, दंड अपुरा, शेतकऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज
- साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!
- Nirmala Sitharaman : GST सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेत 2 लाख कोटी येतील; अर्थमंत्री म्हणाल्या- दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होतील, सामान्य लोकांकडे जास्त पैसे शिल्लक राहतील