नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपले राजकारण साधून घेतले. एकीकडे त्यांनी महापालिका निवडणुकांमधली बंडखोरी शमविण्यासाठी फोन केले, तर दुसरीकडे त्यांनी मराठी सक्तीचे भाषण केले. साताऱ्यातल्या 99 व्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन फडणवीस यांच्या भाषणाने गाजले.Devendra fadnavis politics in Satara Marathi sahitya sammelan
ज्येष्ठ साहित्यिक मृदुला गर्ग यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. त्यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सातारा जिल्ह्यातले सगळे मंत्री पुढे बसले होते. मृदुला गर्ग यांचे भाषण सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांना सारखे फोन येत होते. ते फोन स्क्रोल करत होते. अधून मधून फोनवर कुणाशी तरी बोलत होते. हे सगळे लाईव्ह कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झाले.
– फोन का केले??
या सगळ्या संदर्भातला खुलासा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणामध्ये केला. आज महापालिका निवडणुकांचा महत्त्वाचा दिवस आहे फॉर्म मागे घेण्यासाठी दिवस आहे त्यामुळे मी आमच्या पक्षातल्या बंडखोरांना अर्ज मागे घेण्यासाठी विनंती करणारे फोन करत होतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
– ठाकरे बंधूंचे ऐक्य
त्यापलीकडे जाऊन त्यांनी मुंबईच्या निवडणुकीसाठी उपयुक्त ठरेल असे राजकीय भाष्य केले. महाराष्ट्रात हिंदी सक्तीचा मुद्दा नुकताच गाजला होता. ठाकरे बंधूंनी या मुद्द्याला धरूनच आपले ऐक्य जाहीर केले होते. हिंदी सक्तीच्या मुद्द्याचा फायदा ठाकरे बंधूंना मिळणार हे उघड राजकीय सत्य होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने हिंदी सक्तीचा मुद्दा मागे घेतला, तरी ठाकरे बंधूंचे ऐक्य होणे ते रोखू शकले नाहीत.
– फडणवीसांचा भर मराठी सक्तीवर
देवेंद्र फडणवीस यांनी आज साताऱ्याच्या साहित्य संमेलनात हिंदी सक्तीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात फक्त मराठीची सक्ती चालेल इतर कुठल्याही भाषेची सक्ती चालणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. महाराष्ट्रात तुम्ही कुठलीही भाषा शिका देशातली भाषा शिका किंवा परदेशातली भाषा शिका पण महाराष्ट्रात राहून तुम्हाला मराठीच शिकावी लागेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी ठासून सांगितले. किंबहुना मुंबईची महत्त्वाची निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच त्यांनी हे वक्तव्य केले.
– तपोवनाच्या विषयी “निवडक” कळवळा
याच साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा तारा भवाळकर यांचे भाषण झाले. त्यांनी नाशिकच्या तपोवनचा मुद्दा आपल्या भाषणात उचलून धरला. तपोवनातल्या झाडाझुडपांवर कुऱ्हाड चालवू नये. कारण प्रकृती टिकली तरच आपण टिकू, असा संदेश त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दिला. नाशिक मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने तपोवनातील झाडाझुडपांचा मुद्दा नाशिक मधल्या हिंदू विरोधी पर्यावरणवाद्यांनी तापविला. जी छोटी झाडे झुडपे काढावी लागतील ती काढण्याची सरकारची भूमिका असताना ती मंत्री गिरीश महाजन यांना नीट पुढे रेटता आली नाही. याचा फायदा पर्यावरणवाद्यांनी उचलला. त्यामुळे विरोधकांना हातात आयते कोलीत मिळाले. त्यांनी तपोवनातल्या झाडाझुडपांचा मुद्दा राज्यभर तापविला त्यामुळे महाराष्ट्रातल्या विचारवंतांना सुद्धा अचानक तपोवनचा कळवळा आला. त्याचेच प्रतिबिंब तारा भवाळकर यांच्या भाषणात उमटले.
तारा भवाळकरांनी विद्वत्तापूर्ण भाषण केले. त्यांनी तपोवन विषयी लोकसाहित्य कसे प्रतिबिंब उमटले याचे वर्णन केले. पण प्रत्यक्षात त्यांनी हिंदू विरोधी पर्यावरणवाद्यांची तळी उचलून धरली.
Devendra fadnavis politics in Satara Marathi sahitya sammelan
महत्वाच्या बातम्या
- पिंपरी चिंचवडच्या विकासाचे सारथी लक्ष्मण जगताप यांच्या शक्तिस्थळ’चे लोकार्पण
- Indigo : इंडिगोवर ₹458 कोटींहून अधिकचा जीएसटी दंड; एअरलाइनने म्हटले- आदेशाला आव्हान देणार
- Army Animal : प्रजासत्ताक दिनी सैन्याची पशु तुकडी देखील परेड करणार; बॅक्ट्रियन उंट, झांस्कर टट्टू, रॅप्टर्स आणि श्वान मार्च करतील
- एक हँडशेक केला, तर पाकिस्तान हुरळला, चर्चेसाठी भारताच्या कच्छपी लागला!!