विशेष प्रतिनिधी
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप झाला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन खळबळजनक प्रकरण समोर येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून ते चौकशीच्या स्कॅनर खाली आणले.Devendra fadnavis orders enquiry in Ajit Pawar’s son parth corruption issue
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर विधान परिषदेतले माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी जमीन घोटाळ्याचा आरोप केला. पार्थ पवार यांच्या कंपनीने 1800 कोटींची जमीन अवघ्या 300 कोटींमध्ये खरेदी केली. मुद्रांक शुल्क म्हणून फक्त 500 रुपये दिले, असा आरोप उद्धव अंबादास दानवे यांनी केला. त्यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या प्रकरणासंदर्भात सगळी माहिती मी मागवली आहे. महसूल विभाग, आयजीआर, लँड रेकॉर्डस असतील या संदर्भातील सगळी माहिती मी मागवली आहे. या संदर्भात चौकशीचे आदेश मी दिलेले आहेत. सगळी माहिती आणि जी काही प्राथमिक चौकशी आहे, त्या आधारावर जे काय तुम्हाला सांगायच ते मी सांगणार आहे. अजून संपूर्ण माहिती माझ्याकडे आलेली नाही. प्राथमिक दृष्ट्या जे मुद्दे समोर येत आहेत ते गंभीर आहेत. या प्रकरणी सगळी माहिती घेऊन मी बोलणार आहे. आज सगळी माहिती माझ्याकडे येईल. त्यानंतर शासनाची पुढची दिशा काय असेल?, त्यानंतर काय कारवाई करणार ते सांगू, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
… तर कठोर कारवाई
भ्रष्टाचाराचे आरोप करुन सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे का? त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार अशा कुठल्याही प्रकाराला पाठीशी घालतील असं मला अजिबात वाटत नाही. या संदर्भात सरकारचे एकमत आहे, कुठलीही अनियमितता झाली असेल तर त्यावर कारवाई झाली पाहिजे. अनियमितता झाली आहे की, नाही हे पडताळून पाहिलं जाईल. अनियमितता आढळली तर कठोर कारवाई होईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. फडणवीस यांच्या या उत्तरामुळे अजित पवार आणि पार्थ पवार हे दोघेही राजकीय दृष्ट्या अडचणीत आल्याचे बोलले जात आहे.
– ठाकरे घराबाहेर पडल्याचा आनंद
उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे बाहेर पडले याचा मला आनंद आहे. कारण ते मुख्यमंत्री असताना शेतकरी जेव्हा संकटात होता, तेव्हा ते कार्पेटवरुन खाली उतरले नव्हते” “किमान सततच्या पराभवानंतर त्यांच्या लक्षात आलय की, लोकांमध्ये जावं लागतं. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी त्यांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवली आहे. कारण त्यांना माहितीय की, निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हे आलेले आहेत. लोकांना पकडून, पकडून आणलं जातय. सरकारचं पॅकेज शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पोहोचतय. आरबीआयच्या नियमानुसार दररोज 600 कोटी रुपये द्यावे लागतात” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Devendra fadnavis orders enquiry in Ajit Pawar’s son parth corruption issue
महत्वाच्या बातम्या
- New York : न्यूयॉर्कच्या महापौर निवडणुकीत भारतवंशी ममदानी विजयी; 100 वर्षातील सर्वात तरुण आणि पहिले मुस्लिम महापौर
- Bengaluru Surgeon : तुझ्यासाठी माझ्या बायकोला मारले, बंगळुरूतील सर्जनचा हत्येनंतर 4-5 महिलांना मेसेज; पत्नीची भूल देऊन केली हत्या
- राहुल गांधींना बाकीच्या विरोधकांकडून “लांबून” पाठिंबा; आदित्य ठाकरे सोडून बाकीचे विरोधक अजून vote chori चे प्रेझेंटेशन का नाही करत??
- सत्तेच्या वळचणीला जाण्यासाठी झाले वेगळे, आता पुन्हा सत्तेसाठी एकत्र!!