विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र भाजप विधिमंडळ नेतेपदी निवड होताच नियोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भाषणातून चार निर्णय मनासारखे, तर चार मनाविरुद्ध, असा स्पष्ट इशारा देऊन मंत्रीपदासाठी आशा लावून बसलेल्या नेत्यांच्या महत्त्वाकांक्षांना टाचणी लावलीच, पण त्याचबरोबर फडणवीस सरकारचा पुढचा कार्यकाळ व्यक्तिकेंद्रापासून दूर होऊन निर्णय केंद्रापर्यंत होणार असेल, याची झलक त्यांनी दिली.
महाराष्ट्राच्या जनतेने आपल्याला एवढा मोठा कौल दिलाय की त्यांची अपेक्षापूर्ती करणे हे आपल्या समोरचे सगळ्यात मोठे आव्हान आहे त्यामुळे चार निर्णय आपल्या मनासारखे होतील तर चार निर्णय मनाविरुद्ध होतील पण व्यापक जनहिताचा विचार करून आपण एकत्र राहून काम करू, असे फडणवीस म्हणाले. या वक्तव्यातून त्यांनी मंत्रिपदाची आशा लावून बसलेल्या नेत्यांना अप्रत्यक्ष इशारा दिला.
Ratapani Sanctuary : मध्य प्रदेशातील रतापाणी अभयारण्य व्याघ्र प्रकल्प घोषित
महाराष्ट्राच्या राजकारणाचे माध्यमांमधले रिपोर्टिंग नेहमीच मुख्यमंत्री कोण होणार??, मंत्री कोण होणार??, हेवीवेट कोण??, कुणाला वर चढवले??, कुणाचे पंख छाटले?? हायकमांडने कुणाला कौल दिला??, कुणाला नाकारला??, या सवालांभोवती केंद्रीत राहिले. यात व्यक्तिनिष्ठा प्राधान्य क्रमाने राहिली. निर्णय प्रक्रिया दुय्यम राहिली. काँग्रेसी राजकीय संस्कृतीचा तो भाग होता. माध्यमे वर्षानुवर्षे तशाच आशयाचे रिपोर्टिंग करत राहिले त्यामुळे आजही माध्यमांमध्ये रिपोर्टिंग व्यक्ती केंद्रितच राहून ते भाजपमधल्या निर्णय प्रक्रियेकडे व्यक्तीकेंद्रीत दृष्टिकोनातूनच पाहतात पण प्रत्यक्षात भाजप विशेषता संघ परिवारातील निर्णय प्रक्रिया एवढी व्यक्ती केंद्रित नाही तर ती धोरण आणि निर्णय केंद्रित आहेत.
त्यामुळे माध्यमांनी व्यक्ती केंद्रित राहून कोण मंत्री होणार??, त्यांना कुठली खाती मिळणार??, ती मलाईदार असणार का??, वगैरे कितीही चर्चा केली, तरी प्रत्यक्षात देवेंद्र फडणवीस यांच्या तिसऱ्या कार्यकाळाचा कार्यकाळाची वाटचाल व्यक्तीकेंद्रीत पेक्षा निर्णय केंद्रीत आणि धोरण केंद्रीत राहील हेच त्यांनी आपल्या भाषणातून सूचित केले.