• Download App
    Devendra Fadnavis

    राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या आमदाराच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस + मनोज जरांगे एकत्र; राज्यभरात चर्चेला उधाण!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजपमध्ये आलेल्या आणि आमदार झालेल्या समाधान आवताडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा आंदोलन मनोज जरांगे यांना एकत्र आणायचा घाट घातलाय. मंगळवेढ्यामध्ये उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे ते एका व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यभरात चर्चेला उधाण आले आहे.

    मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलनादरम्यान फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावरच दात धरला होता. त्यांच्यावर अनेकदा अश्लाघ्य भाषेत टीकास्त्र सोडले होते. परंतु, देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत संयमाने सगळी परिस्थिती हाताळून मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले. त्यांनी हैदराबाद सह अन्य गॅझेट लागू करून मराठा समाजाच्या आरक्षणाचे समाधान केले. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या मास्टर माईंडची राजकीय बोलती बंद झाली. मनोज जरांगे यांना निवळण्याशिवाय पर्याय उरला नाही. त्याचवेळी ओबीसी समाजातील छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे यांना धारेवर धरले. त्यावेळी मनोज जरांगे यांना देवेंद्र फडणवीस यांचे समर्थन करणे भाग पडले.



    आता त्यापुढे जाऊन देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे यांच्या 26 ऑक्टोबर रोजी मंगळवेढ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या निमित्ताने एका व्यासपीठावर येण्याची शक्यता निर्माण झाली. कारण राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या आणि आमदार झालेल्या समाधान आवताडे यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलाविले. त्याचबरोबर त्यांनी मनोज जरांगे यांना सुद्धा निमंत्रण दिले. यातून फडणवीस आणि जरांगे यांच्यातली राजकीय दिलजमाई घट्ट करायचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

    Devendra Fadnavis + Manoj Jarange together at the event of the MLA who joined BJP from NCP

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    अत्याधुनिक संरक्षण आणि एअरोस्पेस उत्पादनाचे प्रमुख केंद्र बनतेय नागपूर

    सतत नकारात्मक बातम्या येणाऱ्या बीडमधून सकारात्मक बातमी; प्रधानमंत्री आवास योजनेतील 50000 घरे बांधून पूर्ण; बीडकरांची दिवाळी नवीन घरकुलात साजरी!!

    Uday Samant : उदय सामंतांचा इशारा- आम्ही महायुतीत राहूनच निवडणूक लढवू, कोणी जास्त खुमखुमी दाखवली तर धनुष्यबाण कसा चालतो ते दाखवू