हा सन्मान मी महाराष्ट्राच्या जनतेला समर्पित करतो, असं फडणवीसांनी जाहीर केलं आहे. Devendra Fadnavis is the first Indian to receive an honorary doctorate from Japans Koyasan University
विशेष प्रतिनिधी
जपान : सध्या जपान दौऱ्यावर असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरून मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे.
जपानच्या कोयासान विद्यापीठाने फडणवीस यांना महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकास, जलसंधारण आणि जलयुक्त शिवारसारख्या योजनांद्वारे सामाजिक समता यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी ही मानद डॉक्टरेट प्रदान केली आहे. कोयासन विद्यापीठातून मानद डॉक्टरेट मिळवणारे फडणवीस हे पहिले भारतीय ठरले आहेत.
जपानच्या कोयासान विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट देऊन केलेला हा सन्मान मी महाराष्ट्राच्या जनतेला समर्पित करतो! असं फडणवीसांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र शासनाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा कोयासन विद्यापीठाला दिल्याबद्दल कोयासन विद्यापीठाने देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. जपानमध्ये दरवर्षी डॉ.आंबेडकर जयंती साजरी केली जाते. महाराष्ट्र शासनाच्या वतीने कोयासन विद्यापीठास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा मिळाल्याबद्दल विद्यापीठाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले असून त्याबद्दल ‘प्रशंसनीय पत्र’ दिले आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच दिवसांच्या जपान दौऱ्यावर आहेत. जपानमध्ये पोहोचताच जपानमधील मराठी जनतेने फडणवीस यांचे टोकियो विमानतळावर मराठी शैलीत स्वागत केले. या दौऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जपानच्या अनेक ज्येष्ठ मंत्र्यांची भेट घेणार आहेत. या दौऱ्यात Zaika, Jetro, Zera अशा अनेक ते गुंतवणूकदारांना भेटतील.
Devendra Fadnavis is the first Indian to receive an honorary doctorate from Japans Koyasan University
महत्वाच्या बातम्या
- उद्धव ठाकरेंना सत्ता गेल्याने काय बोलावं हेच कळत नाही; राम मंदिराच्या टीकेवरून नारायण राणेंनी घेतला समाचार
- आता लोकसभा निवडणुका झाल्या तर सरकार कोणाचे येणार? सर्वेक्षणात इंडिया-एनडीएला किती जागा? पाहा आकडेवारी
- पक्ष वाढवायचा की मोदी घालवायचा??, हे ठरवा, नाहीतर तेच बोकांडी बसतील; प्रकाश आंबेडकरांचा मविआच्या नेत्यांना इशारा!!
- पंडित धीरेंद्र शास्त्री लवकरच लग्न करणार; लग्नासाठी येत आहेत भावनिक पत्रे, राम मंदिरावरही केले वक्तव्य