विशेष प्रतिनिधी
मुंबई : बीड जिल्ह्यातल्या राजकीय साठमारीत आज आष्टी मध्ये अवतरली होती बॉलीवूड मधली, ऐतिहासिक आणि पौराणिक पात्रे. या सगळ्यांची जुगलबंदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर रंगली.
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले नेते आमदार सुरेश धस यांच्या स्वप्नातल्या खुंटेवाडी प्रकल्पासंदर्भात मोठा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिथे जाऊन घेतला त्याला बीड जिल्ह्यात रंगलेल्या राजकीय साठमारीची मोठी पार्श्वभूमी होती त्या कार्यक्रमाला धनंजय मुंडे उपस्थित नव्हते. पण पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली. त्याचबरोबर सर्वपक्षीय आमदार आणि खासदार या कार्यक्रमाला उपस्थित होते.
सुरेश धस पंकजा मुंडे देवेंद्र फडणवीस आदी नेत्यांच्या भाषणांमधून बॉलीवूड मधली ऐतिहासिक आणि पौराणिक पात्रे प्रत्यक्ष कार्यक्रमात उतरली. पंकजा मुंडे यांनी स्वतःला शिवगामी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बाहुबली अशी उपमा दिली. सुरेश धस यांनी देखील फडणवीसांना बाहुबली असेच संबोधले, तर देवेंद्र फडणवीस यांनी सुरेश धस यांना आधुनिक भगीरथ असे म्हणून हे भगीरथ एकदा विषय डोक्यात घेतला की आमच्या डोक्यावर बसतात आणि तो विषय सुटल्याशिवाय उतरतच नाहीत, असे सांगितले.
सुरेश धस यांनी आपल्या भाषणामध्ये दीवार, दुश्मन या सिनेमांची उदाहरणे देऊन अमिताभ बच्चन, शशी कपूर, राजेश खन्ना यांची नावे घेऊन बीड जिल्ह्यातल्या राजकारणात फुल बॅटिंग केली. सगळेजण मला विचारतात, तुम्हारे पास क्या है??, तुम मंत्री नही हो!! त्यावेळी मी त्यांना उत्तर देतो, मेरे पास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी का आशीर्वाद है!!, असे म्हणत सुरेश धस यांनी आपल्याच तालुक्यातली सभा जिंकली. पण सगळा कार्यक्रम देवेंद्र फडणवीस यांच्या भोवती फिरला. संतोष देशमुख प्रकरणातल्या कुठल्याही आरोपीला सोडणार नाही असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.
Devendra Fadnavis in Ashti Beed
महत्वाच्या बातम्या
- Ravi Shankar महाकुंभातील चेंगराचेंगरी हे एक षड्यंत्र! भाजप खासदार रविशंकर यांचा संसदेत दावा
- Talkatora Stadium आता दिल्लीच्या ‘तालकटोरा स्टेडियम’चे नाव बदलणार!
- Ayodhya : अयोध्येत दलित तरुणीवर अत्याचार; डोळे फोडले:3 दिवस बेपत्ता तरुणीचा मृतदेह सापडला
- गोदातटीच्या माहेरवाशीणीचा गौरव; राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकरांचा नाशिक मध्ये गुरुवारी भव्य सन्मान सोहळा!!