• Download App
    शिंदेंचं सोडा, अख्खा ठाकरे गटच पुरता अस्वस्थ; फडणवीसांनी दिले पुढच्या फुटीचे संकेतDevendra fadnavis hints at new split in thackeray faction

    शिंदेंचं सोडा, अख्खा ठाकरे गटच पुरता अस्वस्थ; फडणवीसांनी दिले पुढच्या फुटीचे संकेत

    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रातील शिंदे – फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होत नाही म्हणून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतले 9 खासदार आणि 22 आमदार अस्वस्थ आहेत. त्यांची कोणाचीही कामेच होत नाहीत. त्यामुळे तेच ठाकरे गटाच्या संपर्कात आहेत, असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला. सामनातून शिंदे गटाला भाजपच्या खुराड्यातल्या कोंबड्या, 13 तुरेबाज कोंबडे असे चिडवले जात आहे. Devendra fadnavis hints at new split in thackeray faction



    या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र वेगळेच संकेते दिले आहेत. एकनाथ शिंदे यांचे सोडा, पण संपूर्ण ठाकरे गटच आज अस्वस्थ आहे. ते येत्या भविष्यकाळात तुम्हाला लवकरच समजेल, असा सूचक इशारा देत ठाकरे गटाच्या संभाव्य फुटीचे संकेत दिले.

    सुप्रीम कोर्टाच्या निकालासंदर्भात ठाकरे गट कितीही वेगवेगळे दावे करत असला तरी राष्ट्रवादी आणि त्यांच्या शिवसेनेला पक्की माहिती आहे की पोपट मेला आहे. पण आपल्याच कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचू नये म्हणून त्यांचे नेते वेगवेगळी वक्तव्य करत असतात पण अशा कोणत्याही वक्तव्यांमधून सुप्रीम कोर्टाचा निर्णय बदलत नसतो, असा इशाराही फडणवीस यांनी दिला.

    Devendra fadnavis hints at new split in thackeray faction

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Devendra Fadnavis : बालगुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर कायदे करणार; देवेंद्र फडणवीस म्हणाले- गुन्हेगारी वय 18 वरून 16 वर्षे करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करू

    CM Eknath Shinde : ‘मी जे करतो ते फुल प्रूफ करतो!’ सचिन अहिरांच्या पक्षप्रवेशावर एकनाथ शिंदेंची फटकेबाजी, उद्धव ठाकरेंवरही निशाणा

    Chhatrapati Sambhaji Nagar : टीसी घ्यायला आला आणि शिक्षकालाच भोसकले, छत्रपती संभाजीनगर हादरले! अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात