प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील शिंदे – फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होत नाही म्हणून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतले 9 खासदार आणि 22 आमदार अस्वस्थ आहेत. त्यांची कोणाचीही कामेच होत नाहीत. त्यामुळे तेच ठाकरे गटाच्या संपर्कात आहेत, असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला. सामनातून शिंदे गटाला भाजपच्या खुराड्यातल्या कोंबड्या, 13 तुरेबाज कोंबडे असे चिडवले जात आहे. Devendra fadnavis hints at new split in thackeray faction
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र वेगळेच संकेते दिले आहेत. एकनाथ शिंदे यांचे सोडा, पण संपूर्ण ठाकरे गटच आज अस्वस्थ आहे. ते येत्या भविष्यकाळात तुम्हाला लवकरच समजेल, असा सूचक इशारा देत ठाकरे गटाच्या संभाव्य फुटीचे संकेत दिले.
सुप्रीम कोर्टाच्या निकालासंदर्भात ठाकरे गट कितीही वेगवेगळे दावे करत असला तरी राष्ट्रवादी आणि त्यांच्या शिवसेनेला पक्की माहिती आहे की पोपट मेला आहे. पण आपल्याच कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचू नये म्हणून त्यांचे नेते वेगवेगळी वक्तव्य करत असतात पण अशा कोणत्याही वक्तव्यांमधून सुप्रीम कोर्टाचा निर्णय बदलत नसतो, असा इशाराही फडणवीस यांनी दिला.
Devendra fadnavis hints at new split in thackeray faction
महत्वाच्या बातम्या
- आयपीएल चॅम्पियन चेन्नईवर पैशांचा पाऊस, गुजरातलाही मिळाले कोट्यवधी, पाहा पुरस्कारांची संपूर्ण यादी
- कर्नाटक विजयाची डोक्यात गेली हवा; मध्य प्रदेशात काँग्रेसला हव्यात 150 जागा!!
- हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये अमित शाह दाखल; मुख्यमंत्री एन बिरेन सिंह आणि अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक!
- उत्तरप्रदेश विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपाचा दोन्ही जागांवर विजय!