जरांगेंनी काही अटी शर्थींसह २ जानेवारी पर्यंतची मुदत सरकारला दिली आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटीत सुरू केलेले उपोषण अखेर काल थांबवले. सरकारच्या शिष्टमंडळाने काल जरांगेंची भेट घेतली आणि त्यांची समजूत काढली. यानंतर जरांगेंनी काही अटी शर्थींसह २ जानेवारी पर्यंतची मुदत सरकारला दिली आहे. जरांगेंनी उपोषण थांबवल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. Devendra Fadnavis first reaction after Manoj Jarange stopped his fast
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”मराठा आरक्षणासाठी गेल्या ९ दिवसांपासून उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतल्याबद्दल राज्य सरकारच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. या प्रक्रियेत माजी न्यायमूर्ती न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती मारोती गायकवाड यांनी राज्य सरकारला बहुमूल्य सहकार्य केले, मी त्यांचे विशेष आभार मानतो. माझ्या सर्व सहकारी मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांचेही आभार !”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय म्हणाले? –
मनोज जरांगे पाटील यांनी काल उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांना तसेच सकल मराठा समाजाला मनापासून धन्यवाद दिले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत बोलत होते. कायदेतज्ञ एखादे उपोषण सोडवण्यासाठी प्रत्यक्ष उपोषण स्थळी जाणे ही इतिहासातली पहिला घटना असेल असेही मुख्यमंत्री म्हणाले. दोन महिन्यांची मुदत जरांगे पाटील यांनी दिली आहे. मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीतले आरक्षण देण्यासाठी शासन गांभीर्याने पाऊले टाकेल असेही शिंदे म्हणाले.
Devendra Fadnavis first reaction after Manoj Jarange stopped his fast
महत्वाच्या बातम्या
- जेट एअरवेजचे मालक नरेश गोयल यांची ५३८ कोटींची मालमत्ता जप्त ; ‘ED’ची कारवाई
- बिहारमध्ये मोठी दुर्घटना! शरयू नदीत बोट उलटली; १८ जण बुडाले, ७ बेपत्ता
- श्रद्धा कपूरसमोर तुटली पापाराझीच्या महागड्या कॅमेऱ्याची लेन्स! श्रद्धा च्या आश्वासनामुळे श्रद्धाच होते कौतुक!
- क्रिकेटच्या देवाचा वानखेडेवर पुतळा; सी. के. नायडूंनंतर सचिनला मिळाला मान आगळा !!