विशेष प्रतिनिधी
मुंबई : Devendra Fadnavis महाराष्ट्र मध्ये मतदानाची टक्केवारी वाढली आहे. आजपर्यंतचा अनुभव पाहता जेव्हा जेव्हा टक्केवारी वाढली आहे, तेव्हा तेव्हा भाजप आणि मित्र पक्षाला त्याचा फायदा होतो. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये भाजप आणि मित्र पक्षाचे सरकार स्थापन होईल, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज्यात वाढलेली मतदानाची टक्केवारी ही महिलांची असल्याचा दावा देखील त्यांनी केला. नागपूर विमानतळावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, या वेळी ते बोलत होते. Devendra Fadnavis
आम्ही मतदारसंघातील बुथ वरील आकडेवारी जमा केली आहे. आणि प्राथमिक फीडबॅक नुसार महिलांची टक्केवारी वाढलेली असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. सत्ता स्थापनेसाठी अपक्ष उमेदवारांची गरज लागेल का? त्यांच्याशी संपर्क साधण्यात येत आहे का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला होता. मात्र, यावर भारतीय जनता पक्ष आणि आम्ही अद्याप कोणाशी संपर्क साधलेला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. राहुल गांधी नेहमीच अदानींवर आरोप करतात. त्यात काय नवीन काहीच नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री पदाचा निर्णय
मुख्यमंत्री पदाबाबत आतापर्यंत कोणतीही चर्चा झालेली नाही. निकाल आल्यानंतर तिन्ही पक्ष एकत्र बसून याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असा दावा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. साधारणपणे मतदानाची टक्केवारी ज्या पद्धतीने वाढली आहे. त्यात सरकारच्या बाजूने लोकांचा कल असू शकतो, असा दावा देखील फडणवीस यांनी केला आहे.
Devendra Fadnavis expressed confidence
महत्वाच्या बातम्या
- Exit Poll महाराष्ट्रात 11 पैकी 6 एक्झिट पोलमध्ये महायुतीचे सरकार, झारखंडमध्ये 8 पैकी 4 पोलमध्ये भाजपला बहुमत
- Agniveer : राजस्थानच्या अग्निवीरला प्रथमच शहीद दर्जा; दहशतवाद्यांनी डोक्यात झाडली होती गोळी; पॅरा स्पेशल फोर्समध्ये होते
- Exit Poll : आकड्यांच्या जंजाळापलीकडचे सत्य; हिंदू एकजुटीत फूट पाडणाऱ्या जातीय अजेंड्यावर महाराष्ट्राची मात!!