विशेष प्रतिनिधी
मुंबई : बीडमध्ये वाळू माफिया राख माफिया यांचा धुमाकूळ काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारच्या काळापासून सुरू झाला, पण त्याने आता टोक गाठल्यानंतर शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिंता व्यक्त करणारे आधी पत्र लिहिले. त्यांनी आज फोन केला, पण देवेंद्र फडणवीस यांनी तो विषय एका वाक्यात संपविला.
बीड जिल्ह्यामध्ये वाळू माफिया आणि राख माफिया ही सगळी प्रवृत्ती शरद पवारांच्या अखंड राष्ट्रवादीने पोसली. त्यातून धनंजय मुंडे – वाल्मीक कराड सारख्या प्रवृत्ती निर्माण केल्या. बीड जिल्ह्याची प्रतिमा बिहार सारखी बनली. हे सगळे काही 2024-25 मध्ये एकदम घडले नाही. ते काँग्रेस – राष्ट्रवादीच्या सरकारच्या काळापासूनच घडत आले. परंतु, त्यावेळी सत्तेवर असणाऱ्या शरद पवारांनी बीड जिल्ह्यातल्या माफियागिरीला रोखण्याच्या बातम्या आल्या नाहीत. किंवा त्याविषयी चिंता व्यक्त केल्याच्या देखील बातम्या आल्या नाहीत.
2024 मध्ये फडणवीस सरकार पुन्हा आले. त्यानंतर बीड जिल्ह्यात संतोष देशमुख प्रकरण घडले. त्यामुळे शरद पवारांना बीड जिल्ह्यातल्या कायदा सुव्यवस्थेची “चिंता” वाटायला लागली. त्यांनी सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले. बीड जिल्ह्यामध्ये माफियागिरीला अटकाव करण्याची गरज व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी फडणवीसांना फोन केल्याची बातमी आज आली.
या संदर्भात फडणवीसंना नवी मुंबईमध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावेळी फडणवीस यांनी एका वाक्यात तो विषय संपविला. मला पवार साहेबांचे फोन नेहमीच येतात. त्यात नवल काही नाही, असे फडणवीस म्हणाले आणि दुसऱ्या विषयाकडे वळले.
Devendra Fadnavis ended the topic in one sentence.
महत्वाच्या बातम्या
- HMPVच्या वाढत्या प्रकरणानंतर केंद्र सरकार सतर्क; आरोग्य सचिवांनी घेतली बैठक
- 500 ₹ च्या फरकाने महाराष्ट्रात काँग्रेसला तारले नाही; दिल्लीत 400 ₹ चा फरक पक्षाला तारले??
- Mahakumbh : महाकुंभ 2025ची तयारी सुरू, NDRFच्या टीमने केले मॉक ड्रील; 9 जणांचे प्राण वाचवले
- HMPV व्हायरसच्या प्रकरणांबाबत महाराष्ट्र सरकार सतर्क