• Download App
    OBC इम्पिरिकल डेटाचा ठराव म्हणजे वेळकाढूपणा, देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर प्रहार । Devendra Fadnavis Criticizes Thackeray Govt on Propasal of Empirical Data regarding OBC Reservation

    OBC इम्पिरिकल डेटाचा ठराव म्हणजे वेळकाढूपणा, देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर प्रहार

    OBC Reservation : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केवळ दोनच दिवसांत हे अधिवेशन गुंडाळण्याचे महाविकास आघाडीने ठरवले आहे. राज्य सरकार या अधिवेशनात ओबीसींच्या इम्पिरिकल डेटाचा ठराव मांडणार असल्याची समोर आले आहे. यावर माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. इम्पिरीकल डेटाचा ठराव हा निव्वळ वेळकाढूपणा आहे. त्यातून काहीही साध्य होणार नाही. पण तरीही ओबीसींसाठी आम्ही या ठरावाला पाठिंबा देणार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. Devendra Fadnavis Criticizes Thackeray Govt on Proposal of Empirical Data regarding OBC Reservation


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केवळ दोनच दिवसांत हे अधिवेशन गुंडाळण्याचे महाविकास आघाडीने ठरवले आहे. राज्य सरकार या अधिवेशनात ओबीसींच्या इम्पिरिकल डेटाचा ठराव मांडणार असल्याची समोर आले आहे. यावर माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. इम्पिरीकल डेटाचा ठराव हा निव्वळ वेळकाढूपणा आहे. त्यातून काहीही साध्य होणार नाही. पण तरीही ओबीसींसाठी आम्ही या ठरावाला पाठिंबा देणार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

    सरकारचे वेळकाढूपणाचे धोरण

    देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात जाण्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधला. फडणवीसांनी इम्पिरिकल डेटावरून राज्य सरकारवर टीका केली. ओबीसींच्या इम्पिरिकल डेटाचा ठराव म्हणजे वेळकाढूपणाचं धोरण आहे. सर्वोच्च न्यायालयाने इम्पिरिकल इन्क्वायरी करायला सांगितली आहे. सेन्सस नाही. कृष्णमूर्ती खटल्यातही तेच म्हटलं आहे. पण हे सरकार वेळकाढूपणा करून दिशाभूल करण्याचं काम करत आहे. ओबीसींसाठी आमचे या ठरावाला समर्थन आहे. ओबीसी, मराठ्यांसाठी जे काही चांगलं होत असेल त्याला आम्ही पाठिंबा देणार असल्याचं फडणवीस म्हणाले.

    15 महिने झोपले होते का?

    इम्पिरिकल डेटामुळे आरक्षण मिळणार नाही. त्यासाठी इम्पिरिकल इन्क्वायरी करणे गरजेचे आहे. तेव्हाच आरक्षण परत मिळेल. कोर्टाच्या आदेशानंतरही 15 महिने तुम्ही झोपले होते का? या प्रश्नाचं सरकारला उत्तर देता येत नाही. म्हणून ते केंद्राकडे बोट दाखवत असल्याची टीका फडणवीसांनी केली.

    Devendra Fadnavis Criticizes Thackeray Govt on Proposal of Empirical Data regarding OBC Reservation

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य