विशेष प्रतिनिधी
मुंबई : Devendra Fadnavis उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मेरे हैदराबादी भाई, उधरी रहना, इधरकू मत आना, इधरकू तुम्हारा कोई कामा नहीं, असे म्हणत फडणवीस यांनी ओवैसींना हैद्राबादी भाषेत टोला लगावला आहे. तसेच औरंगजेबाच्या मुद्द्यावरूनही असदुद्दीन ओवैसींवर जोरदार टीका केली आहे. अरे सुन ले ओ ओवैसी, कुत्ता भी ना पे** करेगा औरंगजेब की पहचान पर…अब तो तिरंगा लहरायेगा पूरे पाकिस्तान पर, असे फडणवीस म्हणाले. Devendra Fadnavis
मुंबईतील मलाड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार विनोद शेलार यांच्यासाठी तर जोगेश्वरी येथे विद्या ठाकुर आणि भारती लव्हेकर यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीसांच्या सभा पार पडल्या. या सभांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी आणि विरोधकांवर जोरदार निशाणा साधत टीका केली आहे. Devendra Fadnavis
सच्चा मुसलमान औरंगजेबाला हिरो मानत नाही
देवेंद्र फडणवीस ओवैसी यांच्यावर टीका करताना म्हणाले, हल्ली ते ओवैसी देखील आपल्या राज्यात, येथील मतदारसंघांमध्ये येत आहेत, फिरत आहेत. मला त्यांना सांगायचे आहे, मेरे हैदराबादी भाई, उधरी रहना, इधरकू मत आना, इधरकू तुम्हारा कोई कामा नहीं है, असे म्हणत फडणवीसांनी ओवैसी यांना चिमटा काढला आहे. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, येथे येऊन आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत. औरंगजेबाचे महिमामंडन केले जात आहे. त्या लोकांना मला सांगायचे आहे की भारताचा जो सच्चा मुसलमान आहे तो औरंगजेबाला आपला हिरो मानत नाही. कारण औरंगजेब हा एक आक्रमणकारी होता. त्याने आमच्यावर अनेक आक्रमणे केली आहेत. म्हणून मी म्हणतो, अरे सुन ले ओ ओवैसी, कुत्ता भी ना पेशाब करेगा औरंगजेब की पहचान पर…अब तो तिरंगा लहरायेगा पूरे पाकिस्तान पर. Devendra Fadnavis
Trump’s : विजयानंतर ट्रम्प यांचा पुतीन यांच्याशी पहिला संवाद, युक्रेनमधील युद्ध न वाढवण्याचे आवाहन
मुंबईतील मराठी माणसाला बेघर करण्याचे काम उबाठाने केले
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. मुंबईतील मराठी माणसाला बेघर करण्याचे काम उबाठाने केले, असा आरोप त्यांनी केला. पत्राचाळीमध्ये भ्रष्टाचार करत मुंबईतील मराठी माणसाला बेघर करण्याचे काम उबाठाने केले. मात्र, प्रकल्पाला नव्याने मंजुरी देऊन मराठी माणसाला त्याच ठिकाणी घर मिळेल, हे महायुती सरकारने करुन दाखवले. उबाठाचे आणि महाभकास आघाडीचे लोक कधीच विकासावर बोलू शकत नाहीत, असे फडणवीस म्हणाले.
5 वर्षात 354 किलोमीटर लांबीचे मेट्रोचे जाळे उभारले
यापूर्वी मुंबईकरांना केवळ स्वप्ने दाखवली जात होती, काहीही न करता ‘करुन दाखवले’ अशी होर्डिंग्स लावली जात होती. पूर्वीच्या काँग्रेस सरकारने 11 वर्षात 11 किलोमीटरची मेट्रो तयार केली. 2014 मधील आपल्या सरकारने आणि नंतरच्या काळातील महायुती सरकारने 5 वर्षात 354 किलोमीटर लांबीचे मेट्रोचे जाळे उभारले, त्यापैकी 100 किमीचे काम पूर्णत्वासही आलेले आहे, असा दावा फडणवीस यांनी केला.
व्होट जिहादचा नारा दिला जात असेल तर मतांचे धर्मयुद्ध पुकारा
आम्ही कोणत्याही जातीधर्माविरोधात नाही. मात्र, लांगुलचालन खपवून घेणार नाही. कुणी जनाब बाळासाहेब ठाकरे म्हणत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. ओवैसीलाही सांगू इच्छितो की, तुम्ही रझाकारांचे सरकार पुन्हा येथे आणण्याचे स्वप्न पाहू नका, ते स्वप्न आम्ही गाडून टाकू. व्होट जिहादचा नारा दिला जात असेल, तर तुम्ही मतांचे धर्मयुद्ध पुकारा व महायुतीचे राज्य आणा, असेही फडणवीस म्हणाले.
Devendra Fadnavis Criticizes owaisi, Assembly Elecions
महत्वाच्या बातम्या
- Trump’s : विजयानंतर ट्रम्प यांचा पुतीन यांच्याशी पहिला संवाद, युक्रेनमधील युद्ध न वाढवण्याचे आवाहन
- Jaishankar : जयशंकर म्हणाले- ट्रम्प यांच्या विजयामुळे भारत चिंतित नाही, ओबामा-बायडेन आणि डोनाल्ड यांच्याशी मोदींचे वैयक्तिक संबंध
- Kerala Governor : केरळचे राज्यपाल म्हणाले- ‘बटोगे तो कटोगे’ मध्ये काही चुकीचे नाही, जेव्हा आस्था समान असते तेव्हा आपण सर्वांनी एकत्र यायला हवे
- Sanjeev Khanna : न्यायमूर्ती संजीव खन्ना देशाचे 51वे सरन्यायाधीश बनले, सहा महिन्यांच्या कार्यकाळात 5 मोठ्या खटल्यांची सुनावणी होणार